ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

८५ लाखांची पोलीस ठाण्याची इमारत उध्दघाटना अगोदरच काढली भंगारात

August 26, 202114:39 PM 10 0 0

उरण ( संगिता पवार ) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे ८५ लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेली नवीमुंबई पोलीस आयुक्त हद्दीतील मोरा सागरी पोलीस ठाण्याची नवी इमारत उध्दघाटना अगोदरच भंगारात निघाली आहे.त्यामुळे शासनाकडून खर्च करण्यात आलेला ८५ लाखांचा निधी वाया जातो कि काय असा प्रश्न उरणच्या आमजनतेला पडला आहे.


सागरी किनारपट्टी भागातून होणारे दहशतवादी हल्ल्यां वर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि देशातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शासनाने किणारपट्टी वरील सागरी पोलीस ठाण्याना विशेष महत्त्व प्राप्त करून दिले आहे.त्या अनुषंगाने मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मोरा,करंजा बंदर आणि घारापुरी परिसरावर नजर ठेवण्यासाठी शासनाने नवीमुंबई पोलीस आयुक्तांच्या हद्दीत नव्याने मोरा सागरी पोलीस ठाण्याची निर्मिती केली.सदर पोलीस ठाण्यासाठी सुसज्ज इमारत असावी, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उरण शहरातील पेन्शन पार्क येथील भूखंडावर शासनाकडून प्राप्त झालेल्या ८५ लाख निधीतून सुसज्ज इमारतीचे बांधकाम २०१८ ते २०२० या वर्षात हाती घेण्यात आले.
परंतु सदर पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या छताला पावसाळ्यात गळती लागली आहे.त्यात शहरात उध्दभवणाऱ्या पुर परिस्थितीचे पाणी सदर इमारतीच्या तळमजल्यावर साचून राहते, एकंदरीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे उध्दघाटना अगोदरच सदर इमारत भग्नावस्थेत पडून राहिली आहे.तरी राज्यातील जनतेचा पैसा वाया जातो की काय अशी चर्चा सध्या उरणात रंगू लागली आहे.
राज्य शासनाने मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीसाठी ८५ लाखांचा निधी २०१८ मध्ये मंजूर करुन दिला.परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे उध्दघाटना अगोदरच सदर इमारतीच्या छताला पावसाळ्यात गळती लागली असून सदर इमारत उध्दघाटना पुर्वीच अनेक समस्यांनी ग्रासली आहे.तरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व ठेकेदार यांच्या वर कठोर कारवाई करावी,व इमारतीच्या बांधकामासाठी वाया जात असलेला निधी शासनाने अभियंता व सदर ठेकेदारां कडून वसूल करून घ्यावा – जयवंत कोळी मा.सरपंच हनुमान कोळीवाडा
मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या बांधकामासाठी ८५ लाखांचा निधी मंजूर झाला होता.परंतु इतर काम हे निधी अभावी रेंगाळत पडलेले आहे.शासनाकडून निधी मंजूर झाला की उर्वरित काम हाती घेतले जाणार आहे- एस.बी.बांगड उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग उरण

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *