ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

गावातील शिक्षकांना मिळालेला आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणजे संपूर्ण गावाचा सन्मान सोहळा

September 28, 202114:55 PM 4 0 0

सातारा,( विदया निकाळजे) – गावातील शिक्षकांना मिळालेला आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणजे संपूर्ण गावाचा सन्मान सोहळा आहे,असे प्रतिपादन गोंदवले खुर्द ता.माण चे उपसरपंच अमोल पोळ यांनी केले. नुकताच सातारा जिल्ह्यातील माण पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यामध्ये गोंदवले खुर्द गावातील दोन शिक्षक श्री महेंद्र शिलवंत आणि श्री संतोष घोडके यांचा आदर्श शिक्षक म्हणून गौरव करण्यात आला होता.


याच अनुषंगाने या आदर्श शिक्षकांचा सन्मान ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी श्री पोळ पुढे म्हणाले की, एकाच गावातील दोन शिक्षकांना एकाच वेळी आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो ही अतिशय अभिमानाची बाब आहे त्यामुळे गावाचे नाव उज्वल झाले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ सिंधू गाढवे होत्या. कार्यक्रमात प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या माजी संचालक सौ कामिनी शिलवंत,प्रतापराव पाटील सर ,अच्युतराव कदम सर,सत्कार मूर्ती महेंद्र शिलवंत, संतोष घोडके यांनी मनोगत व्यक्त केले.
ग्रामसेवक शरद जाधव यांनी प्रास्ताविक केले.ग्रामपंचायत सदस्य साहेबराव शेडगे यांनी आभार मानले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *