ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शिवसेनेची मुलूखमैदान तोफ म्हणून ओळख असणारे रघुनाथ(भाई) शिंदे यांची कर्जत खालापूर विधानसभा संपर्कप्रमुख पदी नियुक्ती जाहीर

July 15, 202215:06 PM 18 0 0

खोपोली ( कु. अदिती पवार) :  शिवसेना व शिंदे समर्थक सेना असा मोठा राजकीय संघर्ष कर्जत मतदार संघात पहावयास मिळत असून कर्जत चे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी मुख्यमंत्री शिंदे गटात सामील झाल्या नंतर मतदार संघातील बऱ्याच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थोरवेंचे समर्थन करीत आपल्या पदाचे राजीनामे दिले. पण बरेच पदाधिकारी मूळ शिवसेनेच्या बरोबर तटस्थ राहिलेले दिसत आहेत.यापैकी शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख, जिल्हापरिषद उपाध्यक्ष भाई शिंदे हे एक. आज भाई शिंदे यांची कर्जत विधानसभा संपर्कप्रमुख पदी नियुक्ती केल्याची बातमी सेनेच्या मुखपत्र सामना मध्ये आली. सदर बातमी खालापुरात समजताच सर्व शिवसैनिक सैनिकांनी त्यांचे अभिनंदन केले.
दोन दिवसांपूर्वी कर्जत मतदार संघाचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख पंकज पाटील यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना समर्थन देत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तसे थोडी ही वेळ न दडवता शिवसेने कडून भाई शिंदे या खालापुरातील एक दमदार नेत्याला संपर्कप्रमुख पदी नियुक्ती करून एक प्रकारे थोरवे गटाला शह दिल्याचे आज बोलले जात आहे. देवेंद्र साटम आमदार असताना भाई शिंदे यांनी खालापूर तालुका म्हणून एक यशस्वी राजकीय नेता म्हणून आपल्या कार्याची चुणूक दाखवली होती. त्यांनी संपुर्ण मतदार संघ बांधणीत मोलाचे काम करीत शिवसेनेचा भगवा फडकावला होता. एक आक्रमक नेता म्हणून त्यांची ओळख आज ही आहे. जिल्हापरिषद लढवत त्यांनी ती जिंकून जिल्हापरिषद चे उपाध्यक्ष पद ही भूषवले होते त्याकाळी संपूर्ण कर्जत मतदार संघात भाई आपल्या कामाच्या जोरावर गावागावात ओळखले जाऊ लागले होते. मागील दोन वेळेस आमदारकी साठी ही ते प्रयत्न करीत होते पण त्यांना संधी मिळाली नव्हती.

त्यानांतर भाई शिंदे यांनी पुन्हा जिल्हापरिषद लढवली पण त्यांचा निसटता पराभव झाला होता तेव्हा पासून भाई काहीसे पक्षउपक्रमातून बाजूला झालेत का असे बोलले जात होते पण मागील तीन चार वर्षात भाई पुन्हा शिवसेनेत सक्रिय दिसले व आमदारांच्या बंडा नंतर त्यांनी खालापुरात एक मुख्य लीडर ची भूमिका बजावत उद्धव ठाकरे यांच्या मागे भक्कम पाठिंब्याणे उभे राहिलेले दिसले त्यामुळे संपूर्ण विधानसभा ची संपर्कप्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी दिली असल्याचे आज बोलले जात आहे. त्यामुळे ‘ भाई शिंदे बॅक इन ऍक्शन मोड ‘ असेही काही शिवसैनिक बोलत आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *