ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

वस्तऱ्याचा ‘वार’ गळ्याऐवजी ‘पाठीवर’ गेला अन तो थोडक्यात बचावला

February 14, 202213:41 PM 41 0 0

सोलापूर  : पोलिसात दाखल केलेला गुन्हा मागे घेण्याच्या कारणावरून दोन गटातील तुंबळ हाणामारीची घटना सोलापूरमध्ये घडली आहे. या घटनेमुळे न देगाव रोडवरील हौसे वस्तीतील सकट आणि सनकेवस्तीतील वाद पुन्हा उफाळून आला आहे. या हाणामारीत सकट ग्रुपने सनके ग्रुपवर हल्ला केला वस्तऱ्याचा वार गळ्यावर गेला होता मात्र तो हुकवला आणि हा वार पाठीवर गेला त्यामुळे मोठी घटना टळली. याप्रकरणी गुन्हा तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी गुन्हा तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. आकाश राजेंद्र सनके, वय- २३ वर्षे, रा. हौसे वस्ती आमराई, दमाणी नगर यांच्या फिर्यादी वरून रामलिंग सकट, २) राजु सकट, ३) सुमित रुपनर, सर्व राहणार हौसे वस्ती आमराई यांच्या विरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी आकाश सनके व त्याचे मित्र सुमित धोत्रे असे चहा पिण्यासाठी गायत्री नाष्टा कॅन्टीनवर गेले असता, रिक्षा क्रं. एम एच13 सी टी 4388 मधुन आरोपी हे तेथे आले व रिक्षातुन खाली उतरुन फिर्यादीची गच्ची धरुन फिर्यादीस शिवीगाळ करुन, दाखल केलेला गुन्हा मागे घे, नाहीतर तुला खल्लास करतो. असे म्हणून अर्वाच्च शिवीगाळ करुन फिर्यादीस गालावर चापटा मारल्या.त्यावेळी हिसका मारुन फिर्यादी हे घराकडे पळुन जात असताना अमराई मधील श्रीकृष्ण सायकल मार्ट दुकानजवळ आले असता समोरुन रिक्षातुन वरील आरोपी हे पुन्हा आले व फिर्यादीस आरोपी रामलिंग सकट व सुमित रुपनर यांनी हाताने व लाथाबुक्याने मारहाण करुन आरोपी रामलिंग याने त्याचे खिशातुन वस्तरा काढुन फिर्यादीच्या गळयावर मारताना तो फिर्यादी खाली वाकुन चुकविल्याने वस्तरा फिर्यादीच्या पाठीला लागुन तो जखमी झाला. या घटनेचा तपास पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक भोईटे हे करत आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *