ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

नांदेड जिल्ह्याचा शूरविर अधिकारी नक्षलवाद्यांच्या हल्यात धारातिर्थी पडला

August 22, 202115:09 PM 47 0 0

नांदेड प्रतिनिधी  (रूचिरा बेटकर) : मुखेड तालुक्यातील मुक्रामाबाद जवळ छोट्याशा बामणी गावातील इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी)मध्ये कार्यरत सहाय्यक समादेशक सुधाकर शिंदे आज देशाची सेवा करतांना धारातिर्थी पडले आहेत. हा हल्ला आज 20 ऑगस्ट रोजी नक्षलवाद्यांनी घात लावून केला. या हल्यात पंजाब येथील गुरमुखसिंघ यांचाही देह देशाच्या कामी आला.


नांदेड जिल्ह्यातील बामणी ता.मुखेड या गावचे सुधाकर शिंदे हे सन 2000 मध्ये परभणी येथील कृषी विद्यापीठातून कृषी पदवी प्राप्त करून सन 2001 मध्ये आयटीबीपीमध्ये सब इन्सपेक्टर या पदावर रुजू झाले. महाराष्ट्राची शान वाढवत त्यांनी हळूहळू सहाय्यक समादेशक (असीस्टंट कमांडट) या पदापर्यंत पदोन्नती मिळवली. सन 2019 मध्ये त्यांची नियुक्ती छत्तीसगड राज्यात नक्षल प्रतिबंधक पथकात झाली.
आज दि.20 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेच्यासुमारास नक्षलवाद्यांनी घात लावून केलेल्या हल्यात सुधाकर शिंदेसह एएसआय गुरमुखसिंघ हे दोन अधिकारी धारातिर्थी पडले आहेत. नक्षलवाद्यांनी दोन बुलेटप्रुफ जॅकेट, एक वायरलेस सेट, एक ए.के.47 रायफल आणि गोळ्या लुटून नेल्या आहेत. महाराष्ट्राच्या एका शुरविराने नक्षलवाद्यांशी लढतांना आपला जीव देशासाठी अर्पण करून एक आदर्श दाखवला आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *