ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

५४ प्रवाशांनी भरलेली बस ३० फूट खोल कालव्यात कोसळली; बचावकार्य सुरु

February 16, 202113:15 PM 59 0 0

मध्यप्रदेशात भीषण अपघात झाला असून ५४ प्रवाशांनी भरलेली बस कालव्यात कोसळली आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरु करण्यात आलं. सात प्रवाशांना वाचवण्यात आलं असून इतरांचा शोध घेतला जात आहे. बस सतनाच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. बसमध्ये एकूण ५४ प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंत सात प्रवासी पोहत बाहेर आले तर चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. कालवा ३० फूट खोल असल्याने पूर्ण बसच त्यात बुडाली आहे. क्रेनच्या सहाय्याने बस बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. बसचा शोध घेताना अडथळे येत असल्याने बाणसागर धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग रोखण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंग यांनी घटनेची दखल घेतली असून जिल्हाधिकाऱ्य़ांशी चर्चा केली आहे.

Categories: राष्ट्रीय
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *