ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

डोंबिवलीतील सामूहिक बलात्काराच्या भयानक घटनेच्या निषेध निदर्शनांची जनवादी महिला संघटनेची हाक

September 26, 202113:03 PM 87 0 0

डोंबिवली येथील अल्पवयीन मुलीवर 30 नराधमांनी केलेल्या सामूहिक बलात्काराचा अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेची महाराष्ट्र राज्य कमिटी तीव्र निषेध करीत आहे. जाती अंत संघर्ष समितीचे शैलेंद्र कांबळे, पी के लाली, बालन यांनी आपल्या स्थानिक कार्यकर्त्यासोबत ताबडतोब घटनास्थळी जाऊन चौकशी केली आणि पीडितेला व पोलीस स्टेशनला भेट देऊन आरोपींना ताबडतोब अटक करून कडक शिक्षा करण्याची मागणी केली.

महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न सबंध देशभरात ऐरणीवर आलेला असताना भाजपचे केंद्र सरकार मात्र आपली सरकारे असलेल्या राज्यातील अत्याचाराच्या घटना दडवून इतर पक्षांचे राज्य असलेल्या सरकारांवर आरोप ठेवण्यात मग्न आहे.
साकी नाका येथील घटना ताजी असतानाच उल्हासनगरच्या दोन आणि आता ही डोंबिवलीची घटना काळजाचा थरकाप उडवते. साकी नाक्याच्या घटनेत मुंबई पोलिसांनी काही तासांत आरोपीला पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल केला.
डोंबिवलीच्या घटनेतही 30 पैकी 21 आरोपींना अटक झाल्याचे समजते, ही सकारात्मक बाब आहे. उर्वरित आरोपींनाही ताबडतोब अटक करून या सर्वांवर फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये खटला चालवून अत्यंत कठोर शिक्षा झाली पाहिजे ही जनवादी महिला संघटनेची मागणी आहे.
मात्र घटना ताजी असताना कारवाई होते आणि हळूहळू लोक विसरले की राजकीय दबाव, साक्षीदारांना धमक्या इत्यादीमुळे आरोपींना शिक्षा न होता ते सुटतात असा पूर्वीचा अनुभव आहे. पोलीस तपासात देखील त्रुटी राहतात, असे होऊ नये आणि आरोपींना जामीन मिळू नये याकरता पोलीस आणि प्रशासनाने सतर्क रहावे असा इशारा जनवादी महिला संघटनेची राज्य कमिटी देत आहे.
डोंबिवलीच्या या भयानक घटनेविरुद्ध आपल्या सर्व शाखांनी लगेच राज्यभर निषेध निदर्शने करावीत, असे आवाहन जनवादी महिला संघटना करीत आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *