ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

परिषदेचे कार्याध्यक्ष कल्याण दळे यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांनी दिले ठोस आश्‍वासन

June 18, 202212:50 PM 26 0 0

जालना (प्रतिनिधी) : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होवू नये अशी आहग्राची मागणी ओबीसी व्हीजेएनटी बहुजन परिषदेचे प्रदेश कायार्र्ध्यक्ष कल्याण दळे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुक्रवार रोजी भेटलेल्या शिष्टमंडळाची श्री ठाकरे यांनी सविस्तर चर्चा करून ओबीसी समजाच्या होणारा अन्याय दुर करण्याचे आश्‍वास देवून यासाठी शासन कटिब्ध असल्याचे सांगितले.


परिक्षेदेचे प्रदेशाकार्याध्यक्ष कल्याण दळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसीशीचे आरक्षण कायम ठेवण्यासाठी वेळोवेळी आंदोलन करण्यात आले. परंतू ओबीसीना आरक्षणापासून दुर जावे लागत आहे ही बाब लक्षात आल्यामुळे श्री दळे यांनी शासनाकडे जोरदार पाठलाग करीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुक्रवार रोजी एका शिष्टमंडळाव्दारे मुंबई येथे भेटून एका निवेदनामार्फत मुख्यमंत्री यांचे लक्ष वेधले. देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आडनावाच्या आधारे इतर मागास प्रवर्गाचा (ओबीसी) इम्पीरिकल डाटा गोळा करण्याचे काम जयंतकुमार बांठीया आयोगामार्फत सुरु आहे. त्यामुळे ओबीसी समाजामध्ये संताप उसळला आहे.
आडनावाच्या आधारे गोळा करण्यात येत असलेला इम्पीरिकल डाटा मध्ये 27 टक्के ओबीसी आरक्षणाचे प्रमाण कमी होणार आहे. परिणामी शिक्षणात ओबीसीच्या लार्भ्यार्ंंची प्राप्त संख्या घटणार असल्यामुळे मोठे नुकसान होणाची शक्यता निर्माण झाली आहे. हा अन्याय शासनाने ताबडतोब रोखावा अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी मुख्यमंत्री यांनी आश्‍वास देतांना सांगितले की जयंतकुमार बांठीया आयोगाचा डाटा गोळा करण्याचा प्रक्रियातील त्रूटी दूर केल्या जातील. योग्य प्रकारे इम्पीरिकल डाटा गोळा करून तो अहवाल न्यायालयात सादर केला जाईल. मुख्यमंत्री यांनी शिष्टमंडळाला ठोस आश्‍वासन दिल्यामुळे परिक्षेदेचे श्री. दळे यांनी आभार मानले या शिष्टमंडळामध्ये राज्य समन्यवक अरूण खरमाटे, संजय विभूते, दत्तात्रय चेचेर, प्रकाश राठोड आदींचा समावेश होता. सदरील निवदेन ओबीसीचे नेते अन्न नागरी पुरठामंत्री छगन भुजबळ व बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांना हि एका शिष्टमंडळाव्दारे देणात येवून ओबीसी संदर्भातल्या मागण्याचे निवेदन देण्यात आले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *