ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

प्रेमात मुलाचा अडसर, आईने पोटच्या चिमुकल्याची केली हत्या

September 17, 202113:16 PM 11 0 0

जालना : विवाहबाह्य संबंधात मुलगा अडसर ठरत असल्याने एका महिलेने आपल्या 6 वर्षांच्या मुलाची हत्या केल्याची घटना जालनामध्ये घडली आहे. धक्कादायक म्हणजे हत्या केल्यानंतर या महिलेने मुलगा हरवल्याची तक्रार पोलीस स्थानकात दाखल केली. जालन्यातील अंबडमध्ये ही घटना समोर आली आहे.

अंबड तालुक्यातील डावरगाव इथे राहणारी 21 वर्षीय विवाहित महिला तिच्या नातेवाईकाच्या उपचारासाठी मुलाला घेऊन अंबड इथं दवाखान्यात आली होती. नातेवाईकाला दवाखान्यात भरती केल्यानंतर औषध घेण्यासाठी ही महिला मेडिकलमध्ये गेली. त्याचवेळी तीने आपल्या मुलाला प्रियकराच्या स्वाधीन केलं. त्यानंतर मुलगा हरवल्याचा बहाणा करून या महिलेने अंबड पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिस यंत्रणा कामाला लागली.

बुधवारी संध्याकाळी या मुलाचा मृतदेह घनसावंगी रस्त्यावरच्य एका नाल्याच्या बाजूला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता या मुलाच्या तोंडामध्ये बोळे कोंबलेले दिसले. याप्रकरणी तपासात पोलिसांना या महिलेवरच संशय आला. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. महिलेचा प्रियकर नवनाथ जगधने यानेच या मुलाची हत्या केल्याचं समोर आलं. याप्रकरणी पोलिसांनी शीतल उघडे, नवनाथ जगधने आणि त्यांना मदत करणाऱ्या गणेश रोकडे या तिघांना अटक केली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *