ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आंबेडकरी चळवळीचा संवादी भाष्यकार हरपला – गंगाधर ढवळे

March 4, 202114:40 PM 72 0 0

नांदेड – आंबेडकरी विचारवंत, लेखक कवी प्रा. सत्तेश्वर मोरे यांच्या निधनाने चळवळीची मोठी हानी झाली असून नव्या पिढीला त्यांच्या निधनाने पोरकेपण प्राप्त झाले आहे. आंबेडकरी चळवळीतील साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय तथा शैक्षणिक चळवळीतील संवादी भाष्यकार हरपला असे प्रतिपादन येथील साहित्यिक गंगाधर ढवळे यांनी केले. ते प्रा. मोरे यांच्या निधनानंतर घेण्यात आलेल्या आदरांजली सभेत बोलत‌ होते. अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संसद व आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कल्चरल असोसिएशनचे मारोती धुतुरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मार्शल आर्ट कुंग फु कराटे अकादमीचे गंगाधर वडने, अॅड. ज्योती चंदनशिवे, कृष्णा गजभारे, नितीन एंगडे, माया नांदेडकर, सप्तरंगी साहित्य मंडळाचे अनुरत्न वाघमारे, नागोराव डोंगरे, गंगाधर ढवळे, मारोती कदम, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष सम्राट हटकर, गिरबिडे यांची उपस्थिती होती.

नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन (नुटा ) चे सहसचिव तथा अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाचे निमंत्रक व संघटक , प्रख्यात कवी, गझलकार ,नाटककार , समीक्षक तथा वस्तुनिष्ठ आंबेडकरी भूमिकेसाठी सुप्रसिद्ध असलेले साहित्यिक प्रा सतेश्वर मोरे यांचे दि. २ मार्च रोजी दुपारी ४ च्या सुमारास नागपूर शच्या न्यूक्लियस रुग्णालयात दुःखद निधन झाले. यानुषंगाने शहरातील तरोडा शिवरोडस्थित सप्तगिरी काॅलनी येथे लुंबिनी बुद्ध विहारात छोटेखानी आदरांजली कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ढवळे बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, आंबेडकरी समाजात तथा साहित्य क्षेत्रात प्रा. सत्तेश्वर मोरे यांच्या जाण्याने अतीव शोककळा पसरली आहे . अनेक आंबेडकरी साहित्य संमेलनांचे संघटन , प्रवर्तन आणि आयोजन करून प्रा. मोरे यांनी आंबेडकरी चळवळीला कायम गतिमान ठेवण्याचे अविरत कार्य केले. चळवळीत त्यांचा कृतिशील सहभाग, दलित पँथर चळवळीपासून तर खैरलांजी आंदोलनात कारावास भोगण्यापर्यंत राहिला. असंख्य आंबेडकरी तरुण साहित्यिकांची शतकोत्तर फळी तयार करण्यात प्राध्यापक सतेश्वर मोरे यांचा सिंहाचा वाटा आहे.
आदरांजली सभेच्या प्रारंभी तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प वंदन करण्यात आले. त्यानंतर प्रा. सत्तेश्वर मोरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर मान्यवरांनी प्रा. मोरे यांचे जीवनपैलू उलगडणारी मनोगते व्यक्त केली.‌ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगाधर वडने यांनी केले तर आभार युवराज ढवळे यांनी मानले. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्याबद्दल शोकभावना व्यक्त केल्या आहेत. साहित्य संसदेचे अध्यक्ष प्रशांत वंजारे यांनी आॅनलाईन पद्धतीने आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, अनेक आंबेडकरी साहित्य संमेलनाचे संघटक, प्रवर्तक आणि आयोजक असलेले प्रा. सत्तेश्वर मोरे हे वस्तुनिष्ठ आंबेडकरी भूमिकेसाठी प्रसिद्ध होते. समकालीन साहित्य बुद्ध प्रणीत वैज्ञानिकतेवर आधारित असावे आणि त्या अनुषंगाने साहित्य निर्मिती व्हावी यासाठी प्रबोधन आणि प्रयत्न केले. त्यांनी विविध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि उद्घाटकपद भूषविले असून ते आंबेडकरी सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांचे प्रेरणास्थान राहिले आहेत. शेवटी बुद्ध वंदनेनंतर सभेची सांगता झाली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *