ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कामगारांच्या हितासाठी कॉग्रेस पक्षाने नेहमीच पुढाकार घेतला आः गोरंट्याल

November 29, 202115:52 PM 41 0 0

जालना (प्रतिनिधी) : कामगारांच्या हितासाठी कॉग्रेस पक्षाचे नेहमीच सकारात्मक पुढाकार घेवून काम केले आहे. पक्षाचे कार्यकर्ते शेख इब्राहिम यांनी स्वखर्चातून वाटप केलेल्या ईश्रम कार्डचा कामगारांना भविष्यात निश्‍चित फायदा होईल अशा विश्‍वास व्यक्त करुन या उपक्रमाचे आ. कैलास गोरंट्याल यांनी कौतूक केले. नुतन वसाहत भागातील कॉग्रेस पक्षाचे कार्यकर्ते शेख इब्राहिम यांनी आयोजित केलेल्या दिपावली स्नेहमिलन कार्यक्रम व इ-श्रम कार्डचे आज रविवारी आ. कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी आ. गोरंट्याल बोलत होते. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख महेमुद, नगरसेवक अरूण मगरे, विष्णू वाघमारे, अरविंद देशमुख, शेख इब्राहीम आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलतांना आ. गोरंट्याल म्हणाले की, कॉग्रेस पक्षाने नेहमीच सर्व सामान्य व्यक्तींना केंद्र बिंदु माणून काम केले आहे. शेख इब्राहिम यांनी इ -श्रम कार्ड वाटप करुन बाराशे कामगारांना दिपावलीची भेट दिली आहे. या कार्डचा माध्यमातून कामगारांना भविष्यात उपयोग होईल असे सांगून कार्ड वाटप व दिपावली स्नेहमिलन असे सामाजिक उपक्रम प्रेरणादायी असल्याचे आ. गोरंट्याल शेवटी म्हणाले. या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात ई-श्रम कार्डचे वितरण करण्यात आले. यावेळी चंद्रक्रांत रत्नपारखे, इर्शाद कुरेशी, गणेश चांदोडे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वराज मित्र मंडळ, मंमादेवी मित्र मंडळ, राहूल नगर मित्र मंडळ, करम-ऐ- सैलानी मित्रमंडळाच्या पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *