जालना ( प्रतिनिधी) : पायाभरणी पक्की असेल तर मजबूत इमारत उभी राहते. त्याच प्रमाणे मानवी जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षक हेच विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार, भविष्याचा वेध घेण्यासाठी चांगला दृष्टीकोन विकसित करतात .ज्यातून सशक्त नागरिक निर्माण होत असल्याने राष्ट्राच्या जडण-घडणीत शिक्षकांचे योगदान सदैव महत्त्व पूर्ण राहिले आहे. असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ जालना चे अध्यक्ष रो. महेंद्र बागडी यांनी आज येथे बोलताना केले.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ जालना व इनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. 05)एका हॉटेलमध्ये आयोजित शिक्षकांच्या गौरव सोहळ्यात ते बोलत होते.या वेळी सचिव रो. अरूण मोहता, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ सविता लोया ,सचिव छाया हंसोरा, यांची प्रमुख उपस्थिती होती.
रो .महेंद्र बागडी यांनी गुरु -शिष्याची पवित्र परंपरा हा भारतीय संस्कृतीचा महत्वपूर्ण हिस्सा असून शिक्षणाशिवाय माणसाची प्रगती शक्य नाही. अशी धारणा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची होती. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करणाऱ्या शिक्षकांच्या प्रति समाज सदैव कृतज्ञ राहिल .असे रो. महेंद्र बागडी यांनी नमूद केले.
सुञसंचालन सचिव रो. अरूण मोहता यांनी केले तर इनरव्हील च्या सचिव छाया हंसोरा यांनी आभार मानले. या वेळी प्राचार्य डॉ रमेश अग्रवाल, डॉ. राजेंद्र गायकवाड, डॉ. जवाहर काबरा, डॉ. कविता प्राशर, डॉ. रेणुका भावसार, डॉ. धनंजय पाटील, नरेशकुमार ताल्ला, रामदास मेश्राम, लीला ञिवेदी, भावना जाजू,बबीता बाफना, गीता पोरवाल,नंदा कानडे यांचा शाल, श्री फळ, व स्मृती चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमास रो.जगदीश राठी,रो.राजेश सोनी,रो. संदीप मुंदडा,रो. अनिल कुलकर्णी,रो. प्रसाद राव,रो. सुरेश अग्रवाल,रो. शिवपाल शर्मा, रो. रवी झंवर, इनरव्हील च्या कोषाध्यक्षा काजोल पटेल,शीला रायठठ्ठा,विष्णूकांता भक्कड, अपर्णा बागडी, सुनिता अग्रवाल, कल्पना गोसराणी,
यांच्या सह रोटरी, इनरव्हील क्लब च्या पदाधिकारी, सदस्य व शिक्षकांची उपस्थिती होती
Leave a Reply