ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

भ्रष्टाचारी दोघांना एकाच दिवसी रंगेहात पकडले; मंडळ अधिकारी श्रीपाद गंगाधर मोताळे आणि महेश बाळकृष्ण रामदासी दोघे ताब्यात

February 27, 202121:16 PM 53 0 0

जालना(प्रतिनिधी)ः जिल्ह्यात भ्रष्टाचारी लोकसेवकांची मोठी फळी असून त्यापैकी ज्यांच्या तक्रारी येतात त्यांच्यावर यशस्वी सापळा लाऊन लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकार्‍यांडून कारवाई करण्यात येत आहे. अशाच भ्रष्टाचारी लोकसेवकांवर जालना येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकार्‍यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापळे लाऊन यशस्वी कारवाई केली आहे. या कारवाईत एक महसूल विभागाच्या अधिकार्‍याचा तर एक जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागातील कर्मचार्‍याचा समावेश आहे.

मंडळ अधिकारी श्रीपाद गंगाधर मोताळे याच्यावर यशस्वी सापळा
या संदर्भात लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार अंबड तालुक्यातील डोणगाव शिवार येथे गट क्रमांक 33 मधील शेत जमिनीचा वाटणीपत्राच्या आधारे फेरफार झाला होता. या फेरफाराची विभागणी करून देण्यासाठी तक्रारदाराने 25 फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालय अंबड येथे अर्जही दिला होता. त्या अर्जानुसार अंबड तहसीलच्या जामखेड विभागाचे मंडळ अधिकारी श्रीपाद गंगाधर मोताळे (वय 55) याला दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

परंतु, तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने काल (26 फेब्रुवारी) सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दिली. या तक्रारीच्या अनुषंगाने लाच मागितल्याची पडताळणी केली असता मोताळेला तडजोडीअंती चार हजार रुपयांची लाच पंचा समक्ष स्वीकारताना पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक अधिकार्‍यांनी काल औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोरा येथे जय भद्रा किराणा स्टोअरच्या दुकानात सापळा रचला व तिथेच मोताळे यास रंगेहात पकडून ताब्यात घेतले.

पाटबंधारे विभागाचा कनिष्ठ लिपिक महेश बाळकृष्ण रामदासी याच्यावर कारवाई
आपल्याच कार्यालयातील सहकार्‍याची भविष्य निर्वाह निधीची रक्कम मंजूर करून देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेणार्‍या जालना येथील पाटबंधारे विभागाचा कनिष्ठ लिपिक महेश बाळकृष्ण रामदासी (वय 39) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहात पकडले. या प्रकरणातील तक्रारदार हे अंबड येथे पाटबंधारे उपविभागात कार्यरत आहेत. त्यांच्या भविष्य निर्वाह निधीतून रक्कम मंजूर करण्यासाठी त्यांनी मुख्य कार्यालयाकडे अर्ज केला होता. या कार्यालयातील कनिष्ठ लिपिक महेश रामदासी याने हे काम करून देण्यासाठी तक्रारदाराकडे तीन हजार रुपयांची लाच मागितली. लाचेची केलेली मागणी 22 फेब्रुवारीला लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने पंचासमक्ष पडताळणी करून पाहिली. त्यामध्ये तथ्य आढळून आले. त्यानंतर काल सापळा रचण्यात आला. त्यानुसार दुपारी अंबड चौफुली परिसरात एका हॉटेलवर तीन हजार रुपयांची लाच घेताना महेश रामदासी याला लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या अधिकार्‍यांनी रंगेहात पकडले. जालना जिल्ह्यात भ्रष्टाचाराची किड काढून टाकण्यासाठी नागरीकांनी लाच मागणार्‍यांच्या तक्रारी कराव्यात असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंध विभागच्या वतीने करण्यात आले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *