ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

देशाने राजीव गांधी यांच्या प्रगतिशील विचारामुळे तंत्र विज्ञानामध्ये मोठी प्रगती केली : आ. गोरंट्याल

August 22, 202212:40 PM 11 0 0

जालना (प्रतिनिधी) : देशामध्ये स्व. राजीव गांधी यांनी तंत्र विज्ञान प्रणाली स्थापित केल्यामुळे भारत देश जगाच्या पाठीवर महान बनला आहे. युवकांनी राजीव गांधी यांचे प्रगतिशील विचार अमलात आणावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा आ. कैलास गोरंट्याल यांनी केले आहे.
जालना शहर आणि तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त शनिवार रोजी प्रितिसुधाजीनगर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री गोरंट्याल हे बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पुढे बोलतांना आ. कैलास गोरंट्याल म्हणाले की, आज देशामध्ये लाखोंच्या संख्येने सुशिक्षीत बेरोजगारांची संख्या वाढलेली आहे. युवकांच्या हाताला काम नाही. खऱ्या अर्थाने पाहिले तर देशातला युवक हा सैरभैर झालेला दिसत आहे. केंद्रातील भाजप सरकार लाखो लोकांना नौकऱ्या देण्याऐवजी जाती-पातीच्या राजकारणावर भर देत आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे श्री गोरंट्याल यांनी सांगीतले. स्व. गांधी यांनी आधुनिक भारत घडविण्यासाठी देशामध्ये तंत्र विज्ञानाचे जाळे पसरविले नसते तर आपला देश जगाच्या पाठीवर फार मागे पडला असता. म्हणून युवकांनी या आधुनिक युगात स्व. गांधी यांचे विचार अंमलता आणणे गरजेचे आहे.

यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वसंत जाधव, जिल्हा सरचिटणीस राम सावंत यांनी स्व. गांधी यांना अभिवादन पर भाषण करतांना सांगीतले की, स्व. गांधी यांचे विचार देशाला प्रगतिशील राष्ट्र बणविन्यासाठी फार महत्वाचे ठरले आहे. देशातील नवतरूणांनी तंत्र विज्ञानामध्ये प्रगती करणे म्हणजेच देशाला जगाच्या पाठीवर नावलौकीक मिळून देणे होय. या प्रसंगी अशोक नावकर, नंदाताई पवार, अजेयभाऊ चव्हाण, फकीरा वाघ, बाबासाहेब सोनवने, सय्यद करीम बिल्डर, अर्जुन राऊत, संतोष माधेवाले, गणेश चांदोडे, गणेश चौधरी, कलिम खान, सय्यद रहिम तांबोळी, अनिल कांबळे, अंकुश चव्हाण, नितिन कानडे, बद्रीनाथ जाधव, अरूण घडलिंग, बापु साळवे, सुरेश बोरूडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share