उरण ( संगिता पवार )उरण तालुक्यातील कंठवली – विंधणे येथे मंगळवार ( दि. २६ ) ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता तीर्थधाम चे कळस -शिखर कार्यारंभ कार्यक्रम होणार आहे .त्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती भगवंत सेवक किसनराव राठोड यांनी प्रसिद्धी पत्र्काद्यारे दिली आहे .
या कार्यक्रमात श्री क्षेत्रकाशी ,वाराणशी ,येथून येणाऱ्या विटा व सप्त नद्यांचे जल यांचे स्वागत व पूजन केले जाणार आहे .दुपारी १ वाजता महाभोग व महाप्रसाद चे आयोजनकरण्यात आले आहे . या तीर्थधाम मध्ये श्री दुर्गामाता ( ९ दुर्गा ) ,१२ ज्योतिर्लिंग ,अष्टविनायक ( गणपती मंदिर ),श्री राम मंदिर ,श्री राधा कृष्ण मंदिर ,हनुमान मंदिर ,नऊ ग्रह -श्री शनी मंदिर ,प्रती पंढरपूर ,( विठ्ठल -रखुमाई मंदिर ),प्रती गाणगापूर ( गुरदेव दत्त मंदिर ),श्री बालाजी मंदिर ( प्रती तिरुपती ),प्रती शिर्डी ( साई बाबा मंदिर ),प्रती अक्कलकोट (श्री स्वामी समर्थ मंदिर ),शी सेवालाल ,महाराज मंदिर व शी हमुलालमहाराज मंदिर ,देवी -देवता संत महापुरुष प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे .असे भगवंतसेवक किसनराव राठोड यांनी सांगितले .
Leave a Reply