ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

देगावचाळ येथील कन्या डॉ. जयश्री सावळे यांचे घवघवीत यश

September 23, 202115:20 PM 7 0 0

नांदेड – शहरातील देगावचाळ येथील मूळ रहिवासी असलेल्या डॉ.जयश्री चंद्रकांत सावळे ह्या इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथून एमबीबीएस एमडी (बालरोगतज्ज्ञ) ही परीक्षा नागपुर महाविद्यालयात प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाल्या आहेत. पोलीस विभागातील सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सावळे यांची कन्या आहे. डॉ.जयश्री ह्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण लातूर येथील केशवराज विद्यालय व शाहु महाविद्यालय येथे झाले आहे. डॉ.जयश्री सावळे हिचे एमबीबीएसचे शिक्षण नामांकित असलेले जे.जे. वैद्यकीय महाविद्यालय,मुंबई येथे व एमडीचे शिक्षण इंदिरागांधी वैद्यकीय महाविद्यालयात,नागपूर येथे झालेले आहे. डॉ. जयश्री ह्या आपल्या उच्चविद्याविभूषित होण्याचे श्रेय आपल्या वडिलांसह आई लक्ष्मीबाई सावळे, आजोबा लक्ष्मण सावळे, आजी मुक्ताबाई सावळे ह्यांना देतात.


डॉ. जयश्री यांच्या अभुतपुर्व यशाबद्दल न्यायाधीश रावसाहेब कोकरे,पो. नि. विजयकुमार डोंगरे , श्री.भगवंतसिंग हुजुरिया, डॉ.विनोद बोधीगीरे, डॉ. प्रमोद धुतडे, SBI बँकेचे आशिष जाधव, पाटील लक्ष्मीकांत (कृषी आधिकारी), वसंत जारीकोठे (अभियंता), किरण सोनखेडकर, संतोष भवनगिरे , श्री संतोष चंचलवार शाखा अभियंता, झाकिर, सर दिपक महालिंगे( वरिष्ठ लिपिक, जि.प. नांदेड), संदिप ढगे, किसनराव सावळे, पंढरी सावळे, नामदेव थोरात, प्रा. विजय गंगावणे, बनकर, साहित्यिक गंगाधर ढवळे, सुभाष लोखंडे, ज्ञानोबा दुधमल.साहेबराव थोरात, ग्रंथ वाचक राहुल कोकरे , डी एन कांबळे, राष्ट्रपाल झिंझाडे, बाळासाहेब साहेबराव देशमुख, सुरेश सावळे इत्यादींनी अभिनंदन केले असुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *