ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्ताने आयोजित केलेली जिल्हास्तरीय आमदार जलतरण स्पर्धा दिमाखात पडली पार

August 17, 202215:05 PM 9 0 0

उरण (तृप्ती भोईर ) : सोमवार दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी महेश बालदी मित्र मंडळ , मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण” , हौसी जलतरण संघटना उरण तसेच आलोक ॲक्वा इंजिनीअर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने आमदार जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेची सुरुवात सकाळी ठीक १०:०० वाजता माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक श्री- रवी भोईर साहेब (भाजपा तालुका अध्यक्ष) , कौशिक शहा नगरसेवक (शहर अध्यक्ष भाजपा ) , जयविन कोळी (उपनगराध्यक्ष) , श्री धनंजय कडवे (उरण नगरसेवक) ,श्री विजय भोईर ( रायगड जिल्हा परिषद सदस्य – नवघर)
मी उरण कर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण चे संस्थापक अध्यक्ष – विशाल पाटेकर , हौसी जलतरण संघटनाचे अध्यक्ष श्री संतोष पाटील, आणि सेक्रेटरी – सुनील पाटील यांच्या उपस्थितीत ही स्पर्धा पार पडली.
या स्पर्धेत एकूण २१० स्पर्धकांनी सहभाग घेतला. अतिशय रंगतदार व उत्साहाच्या वातावरणात या स्पर्धेची सांगता झाली. स्पर्धेसाठी आलेले पाहुणे यांनी सहभागी झालेल्या स्पर्धकांसाठी गौरवोद्गार काढले. सौ सायली ताई म्हात्रे (उरण नगराध्यक्ष) आणि श्री संतोष माळी साहेब (उरण नगरपरिषद मुख्याधिकारी) प्रमुख पाहुणे म्हणून श्री रुपाली रेपाले – इंटरनॅशनल लाँग डीस्टनस स्वीमर , स्विम सेवन सिझ ( सात समुद्र पोहणारी ) , शिव छत्रपती अवॉर्ड , टांझानिया नार्वे अवॉर्ड , महाराष्ट्रातील पहिली इंटरनॅशनल स्विमर . यांनीही उत्तम मार्गदर्शन करून मुलांचे कौतुक केले .
यावेळी हितेश भोईर ,ओमकार कोळी, रुद्रक्षी टेमकर , आर्य किशोर पाटील , मोहित म्हात्रे , साई पाटील या सर्वांचे सहकार्य लाभले म्हणून यांचे सत्कार करून आभार मानले .

जिल्हास्तरीय या स्पर्धेस विशेष सहकार्य सौ प्रज्ञा मोरकडकर , अनिरुद्ध महाडिक , किरण मडवी , प्रशांत कुथे ,महेश ढेरे , ओमकार कोळी , पूर्णिमा पाटील , प्रियांशू पाटील , आणि मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान चे सभासद विकास पाटेकर , भावेश रावल , भद्रेस रावल , बादल म्हात्रे ,सायली पाटेकर , अमन शर्मा , अवी जैन , अंकित गुप्ता , लाइफ गार्ड – अक्षय / विजय यांचे कार्यक्रम प्रसंगी आभार मानले .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *