ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शहरातील झोपडपट्टी भागात विकासाची कामे करुन चेहरा मोहरा बदलणारः आ. कैलास गोरंट्याल

February 23, 202113:14 PM 46 0 0

जालना (प्रतिनिधी) ः जालना शहरात विकासाची कामे करण्यासाठी जालना पालिकेकडून आवश्यक ते नियोजन करण्यात येत असुन येणार्‍या काळात शहरातील सर्व झोपडपट्टी भागात विकासाची भरीव कामे करुन या भागाचा संपुर्ण चेहरा मोहरा बदलून टाकणार असल्याचे प्रतिपादन आ. कैलास गोरंट्याल यांनी आज येथे बोलतांना केले आहे.

जुना जालना भागातील शास्त्री मोहल्ला परीसरात उभारण्यात आलेल्या स्व. भुदेवी किसनलाल समाज मंदीराचे लोक अर्पण आज सोमवारी सकाळी आ. कैलास गोंरट्याल यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक बाबुराव पवार, वाजेद खान, अमजेद खान, सय्यद रहिम,अभियंता सय्यद सऊद, एम.पी. पवार आदीची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी पुढे बोलतांना आ. कैलास गोरंट्याल म्हणाले की, गेल्या चार वर्षात जालना नगरपालिकेच्या माध्यमातुन शहरातील प्रत्येक भागात विकासाची कामे करण्यात आली आहेत. त्या प्रामुख्याने अंतर्गत रस्ते, भुमीगत गटार, अंतर्गत जलवाहीनी या कामांसह स्वच्छता, लाईट इत्यादी कामे करुन जालनेकरांना चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला आहे. शास्त्री मोहल्ला भागातील मातंग समाज बांधवांना स्मशान भुमीसाठी संरक्षण भित आणि समाज मंदीर या दोन कामाबद्दल आपण आश्‍वासन दिले होते. त्यापैकी संरक्षण भिंतीचे काम या पुर्वीच पुर्ण झाले असून आज भुदेवी गोरंट्याल सामाजीक सभागृहाचे देखील आपल्या सर्वांच्या साक्षीने लोकार्पण होत आहे. शहरातील सर्वंच झोपटी भागात येणार्‍या कालावधीत विविध योजनांच्या माध्यमातुन विकासांची भरीव कामे केली जाईल अशी ग्वाही देत वाजेद खान आणि अमजद खान यांच्या कार्याचे आ. गोरंट्याल यांनी आपल्या भाषणातुन कौतुक केले. या कार्यक्रमास परीसरातील नागरीक, महिला व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *