ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

औरंगाबादमध्ये बापानं सांगितलं मुलगा कोरोनानं गेला पण कॉलनीतल्या काही तरुणांना तो भिक मागताना दिसला

December 17, 202113:20 PM 53 0 0

औरंगाबादः पैशांसाठी माणुसकी कुठल्या थराला जाऊ शकते याचा दाखला देणारी घटना औरंगाबादमध्ये उघडकीस आली आहे. वाळूज परिसरात राहणाऱ्या एका बापाचा मुलगा थोडा भोळसर असल्याने त्याला मुलाला भिक मागायला भाग पाडला. तसंच घराच्या आसपास लोकांना तो मृत झाल्याचे सांगत, त्याचा दशक्रिया विधीही उरकला. मात्र तीन दिवसांपूर्वी कॉलनीतल्या काही तरुणांना तो घाटी परिसरात भिक मागताना दिसून आल्याने ही धक्कादायक घटना उघडकीस आली.


काय घडलं नेमकं?
घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रांजणगाव भागात राहणाऱ्या 17 वर्षीय भोळसर मुलाच्या आईने पहिल्या पतीने निधन झाल्यावर सहा महिन्यांपूर्वी दुसरे लग्न केले. दरम्यान तिचा पहिल्या नवऱ्यापासूनचा मुलगा भोळसर असल्याने त्याला आयुष्यभर सांभाळावे लागू शकते, असे सावत्र बापाला वाटले. त्याने एक वेगळाच कट रचला. मुलाच्या छातीत दुखत आहे, असे सांगून त्याला घाटी रुग्णालयात नेले. तेथेच सोडून आला. हा भोळसर मुलगा घाटीच्या आवारातच भीक मागू लागला. इकडे घरी आल्यानंतर बापाने मुलाचे कोरोनामुळे निधन झाल्याचे शेजाऱ्यांना सांगून जिवंतपणीच मुलाचा दशक्रिया विधी करण्यात आला.
मुलाला सांगितले आई घ्यायला येईल…
रांजणगावमधीलच तीन तरुणांना या बापाचा मुलगा घाटी परिरात भीक मागताना दिसला. त्यांनी या बापाला घरी येऊन सांगितले, पण त्यांनी तर मुलाचा हार घातलेला फोटो दाखवला. मुलाचे वडील खोटे बोलत असल्याचे लक्षात आल्याने तरुणांनी ही गोष्ट शेजाऱ्यांना सांगितली. अखेर बापासमोर मुलाला आणून उभे केले असता बापाची भंबेरी उडाली आणि सर्व नाटक समोर आले.
दरम्यान, या भोळसर मुलाला घरी आणायचे ठरवल्यानंतर त्याने नकार दिला होता. आई मला घेण्यासाठी येणार असल्याचे सांगत त्याने नकार दिला. मात्र खूप समजावून सांगितल्यानंतर तो घरी येण्यास तयार झाला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *