जालना ( प्रतिनिधी) : नगर परिषदेच्या कर विभागास काल रात्री उशिरा अचानक आग लागून सर्व महत्त्वाचे दस्ताऐवज जळून खाक झाले आहेत .ही आग लागली की लावण्यात आली ?असा संशय या निमित्ताने व्यक्त होत असून या घटनेची निष्पक्ष चौकशी करून आगीचे गोडबंगाल जनतेसमोर आले पाहिजे अशा सूचना भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी केल्या. श्री राऊत यांनी गुरूवारी ( ता. २९) नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीत जावून मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांच्या समवेत जळीत कर विभागाची पाहणी केली.
राजेश राऊत पुढे म्हणाले, ” अ” वर्ग दर्जा प्राप्त असलेल्या जालना नगर परिषदेला शहरातील मालमत्ता धारकांकडून मिळणारा कर हे पालिकेच्या उत्पन्नाचे महत्वपूर्ण साधन असून कर संकलना बाबत अत्यंत महत्त्वाची अभिलेखे आगीत भस्मसात झाल्याचे दिसून येते.असे राजेश राऊत यांनी नमूद केले
शॉर्ट सर्किट ने सदर आग लागल्याची माहिती मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी आपल्या निदर्शनास आणून दिली. तथापि संगणकात अभिलेखांची नोंद असली तरी सदर आगीच्या घटनेची निष्पक्ष चौकशी करून सर्व काही शहरवासीयां समोर आले पाहिजे. अशा सूचना ही राजेश राऊत यांनी यावेळी दिल्या.
Leave a Reply