ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जालना येथे कुरेशी समाजाचा मेळावा उत्साहात संपन्न, रक्तदान शिबिरात 54 रक्तदात्यांचे रक्तदान

September 14, 202113:04 PM 7 0 0

जालना/असलम कुरेशी जालना येथे रविवारी 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता कुरेशी समाजाच्या मेळावा उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी आयोजित शिबिरात 54 रक्तदात्यांनी रक्तदान केले. जालना येथीलमंठा चौफुली वरील जालना सिटी लॉन्स येथे ऑल इंडिया जमियतुल क़ुरैश संघटनेच्या वतीने कुरेशी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महेमुद पहेलवान कुरेशी होते. तसेच ऑल इंडिया जमियतुल क़ुरैशचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इम्रान बाबु कुरेशी, ऑल इंडिया जमियतुल क़ुरैशचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हाजी मो. अय्युब कुरेशी, ऑल इंडिया जमियतुल क़ुरैश युथ विंगचे प्रदेश अध्यक्ष अबु सोफ़ियान कुरेशी, महाराष्ट्र प्रदेश युथ विंगचे सचिव आकिफ़ हमीद कुरेशी, प्रदेश उपाध्यक्ष हाजी कदीर चौधरी, ऑल इंडिया जमियतुल क़ुरैश युथ विंगचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष कलीम कुरेशी, औरंगाबादचे कार्यकारी अध्यक्ष इम्रान चौधरी, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मो. फ़ज़ल कुरेशी, युथ विंगचे मराठवाडा अध्यक्ष असलम कुरेशी, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष हाजी इसा कुरेशी, फ़य्याज़ कुरेशी, बिलाल कुरेशी, मो. फज़ल कुरेशी, गुलाम जिलानी मिसबाही आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी कुरेशी समाजाच्या शैक्षणिक शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक विषयावर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तत्पूर्वी आयोजित रक्तदान शिबिरात 54 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ऑल इंडिया जमियतुल क़ुरैशचे जिल्हाध्यक्ष असलम कुरेशी, परवेज़ चौधरी, हाजी वसिम चौधरी, सगीर कुरेशी, बाबा कुरेशी, ज़हिर कुरेशी, जावेद कुरेशी, गफ़्फार कुरेशी, नासेर कुरेशी, सलीम चौधरी, मोईन कुरेशी, मुज्जू कुरेशी, राज़ेक कुरेशी, हनिफ कुरेशी, अझर कुरेशी, एकबाल कुरेशी, आसिफ कुरेशी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अहमद नुर कुरेशी यांनी केले तर आभार प्रदर्शन हाजी वसिम चौधरी यांनी केले.
जालना येथे कुरेशी समाजाचा मेळावा उत्साहात संपन्न, रक्तदान शिबिरात 54 रक्तदात्यांचे रक्तदान

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *