दि. 26 डिसेंबर 2020 रोजी हॉटेल अतिथी, नांदेड येथे चिनलोन असोसिएशन ऑफ महाराष्ट्राची वार्षीक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आली होती. या सभेसाठी महाराष्ट्रातील 20 जिल्हयांची उपस्थिती होती. यावेळी चिनलोन फेडरेशन ऑफ इंडीयाचे अध्यक्ष सिल्वराज आसन यांनी ऑनलाईन द्वारे उपस्थित राहून सभेला मार्गदर्शन केले व भविष्यात या खोळाला शालेय क्रीडा स्पर्धेत समावेश करण्याकरिता महासंघाच्या वतीने प्रयत्न केले जात आहे. तसेच चिनलोन असोसिएशन ऑफ महाराष्ट्राला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या सभेला चिनलोन असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रविण कूपटीकर यांनी चिनलोन खेळासाठी सर्व जिल्हा संघटनेनी जिद्दीने कार्य करावे व संघटन टिकवण्यासाठी शिस्त महत्वाची असल्याचे मनोगत व्यक्त केले तर राज्यसंघटनेचे सचिव रविकूमार बकवाड यांनी राज्यात चिनलोन खेळाचा प्रचार व प्रसार महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयातील तालूका ते गावपातळी पर्यंत करावा तसेच राष्ट्रीय व राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर व स्पर्धेचा धोरणात्मक विचार सभेत मांडला.या वेळी राज्य संघटनेवर जालन्याचे शेख चाँद पी.जे. यांची उपाध्यक्षपदी तर लातुरचे शिवानंद मठपती यांची सहसचिवपदी बिनवीरोध निवड करण्यात आली.
या प्रसंगी विविध जिल्ह्यातुन जितेश लोटनकर, सुहास कांवळे, धर्मेश सानु, सूमेध गाकवाड, प्रकाश महाजन, सूरेश त्रिभवन, अमोल काटकर, समीर काझी, दिलीप सुर्यवंशी, योगीता अरहन, दिलीप हनुमंते, श्रीकांत अंकुशे यांची उपस्थिती होती. या सभेचे आयोजन व नियोजन चिनलोन असोसिएशन ऑफ नांदेडच्या वतीने करण्यात आले होते.
Leave a Reply