ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

10 वी व 12 वी मध्ये प्रथम आलेल्या मुलींचा पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते धनादेश देऊन गौरव

April 6, 202113:55 PM 33 0 0

जालना :- बेटीबचाओ बेटी पढाओ अभियानांतर्गत इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये प्रथम आलेल्या जालना जिल्ह्यातील १० मुलींचा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात प्रत्येकी 5 हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरव करण्यात आला.

यामध्ये श्रृष्टी विरेंद्र सिंह, विधी संदीप झंवर, पुनम महावीर लोढा, प्रतिक्षा सुखदेव शिंदे, नियती विनोद अग्रवाल, टिना राधेशाम अग्रवाल, ऋतुजा शंकर दातीर, आस्था आनंद अग्रवाल, गायत्री प्रमोद पठाडे व नेहा शिवाजी गाढेकर या मुलींचा गौरव करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, शिक्षणाणिकारी (मा) आशा गरुड यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *