जालना (प्रतिनिधी) ः रक्तदान केल्याने अनेकांना जिवदान मिळत असते, त्यामुळे रक्तदानाचे सत्कार्य हे अत्यंत महत्वाचे असून या सत्कार्यात अनेकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आ. कैलास गोरंट्याल यांनी केले. प्रजासत्ताक दिन आणि सामाजीक कार्यकर्ते परसराम आप्पा अवघड यांच्या वाढदिवसानिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरा प्रसंगी ते बोलत होते. या रक्तदान शिबीराचे उद्घाटन आ. कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रदिप हुसे यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख पाहुने म्हणून जालना नगराच्या प्रथम नागरीक तथा नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंंट्याल, सौ. ज्योती अवघड, डॉ. संजय काळबांडे, राहुल डोंगरे, दलितमित्र बाबुराव मामा सतकर, सुधाकर निकाळजे, अॅड. भास्कर मगरे, अच्युत मोरे, भागवत राऊत, बद्रीनारायण भसांडे, यांच्यासह अनेकांची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना आ. कैलास गोरंट्याल म्हणाले की, जालना शहरातील प्रत्येक वाडाला स्वच्छ आणि सुदर करण्यासाठी नागरीकांनी सुचविलेले काम केले जाणार असून त्यासाठी लागणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही. गल्लोगल्ली रस्ते आणि नाल्यासह पिण्याचे पाणी उपलब्ध करुन दिले जात आहे असेही त्यांनी यावेळी सांगीतले. वाढदिवस साजरा करतांना रक्तदान शिबीराचे आयोजन करणे ही परंपरा सुरु होणे गरजचे असून वाढदिवस साजरा करतांना होणारा खर्च आणि वेळेची बचत करण्यासह जनसेवा आणि जिवदान देण्याचे पवित्र काम परसराम आप्पा अवघड यांनी केल्याने त्यांचा आदर्श इतरांनी देखील घ्यावा असे आवाह आ.कैलास गोरंट्याल यांनी केले आहे.
यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीचे डॉ. रुबीना अवसोई, शरद खोत, विनायक वैद्य, अरुण धोत्रे, सनी गुढेकर, संतोष वाघमारे, प्राजक्ता जोशी, किशोर दाभाडे यांनी रक्त संकलन केले. या वेळी भारत मदने, नरेश अवघड, भाऊसाहेब गायकवाड, सचिन अवघड, जगदीश ढगे, अक्षय अवघड, परसराम लिंगसे, पांडुरंग बळप, सुरेष सतकर, बायस, परमेश्वर गोगडे, शिवराम सतकर, अनिल गोफने, ऋषी गाढे, सखाराम लाड, जयंत देशमुख, व्यवहारे, विधाटे, गीराम, सचिन क्षीरसागर, ठाकरे, पाटील, राऊत, चव्हाण, चापुलकर, कोंडामंगल, देवडे, गव्हाणे, देवकर, सरोदे, सोसे, यश अवघड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
Leave a Reply