ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शासनाने शेतकऱ्यास मदत दिली पाहिजे

October 4, 202114:01 PM 97 0 0

राज्यात गेल्या काही दिवसात अतिवृष्टीमुळे २२ जिल्ह्यातील सुमारे ३५ ते ४० लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या “गुलाब” नावाच्या चक्रीवादळ याचा सर्वाधिक फटका मराठवाडा आणि खान्देशाला बसला आहे.हातातोंडाशी आलेली पीके वाहून गेल्याने सर्व शेतकरी हवालदिल झालेले आहेत.अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका शेतीला बसल्याने ओला दुष्काळ जाहीर करून सरकट सर्व शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी सर्व शेतकरी करू लागले आहेत. अतिवृष्टीमुळे औरंगाबाद,जालना,परभणी,हिंगोली, नांदेड ,बीड,लातूर,उस्मानाबाद,तसेच जळगाव, बुलढाणा,यवतमाळ,वाशिम या जिल्ह्यात अजूनही पुरपरस्थिती कायम असून अनेक गावाचा वाड्या वस्त्यांचा संपर्क तूटलेला आहे.काही गावात तर अडचणीमुळे तपास यंत्रणा पोहचू शकलेली नाही एकट्या मराठवाड्यात २५ लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे.शेती बरोबरच सुमारे अडीच हजार घरांचे तर अंदाजे ३५ ते ३६ लाख शेतकऱ्यांचे सुमारे २९ ते ३० लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.तसेच ४ हजार तीनशे किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे नुकसान झाले असून छोटे मोठे १२०० पूल वाहून गेले आहेत.पुरामुळे ११० गावांचा संपर्क तुटला असून १० ते २० गावांना पुराचा पाण्याचा वेढा पडला आहे.
याशिवाय जिल्हा परिषदेच्या शाळांच्या खोल्या पडल्या असून ,२०५ तलाव फुटले आहेत.त्यामुळे अनेक गावातील पिण्याच्या पाण्याचे तलाव फुटल्याने पाणी अडवून कसे ठेवयाचे असा प्रश्न निर्माण झाला आहे,दरम्यान जायकवाडीतून पाण्याचं ऊपसर्ग गुरुवारी दुपारी काहीसा कमी करण्यात आल्याने जलसंकटाचे उग्ररूप काहीसे कमी झाले आहे.मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे सुमारे २ हजार २५४ कोटी रुपयांचे नुकसान झाले असावे.असा अंदाज राज्य सरकारकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सादर केलेला आहे.


राज्यात आता पर्यंत अतिवृष्टीमुळे ४३९ जणांचा मृत्यू झाला असून यंदा शेतीचे नुकसान साधारणतः ४० ते ५० लाख हेक्टरच्या घरात जाण्याची शक्यता असल्याचे मदत व पुनर्वसन विभागातील सूत्रांनी सांगितले.यंदा कृषी उत्पादन चांगले होण्याची अपेक्षा होती व पावसा मुळे सर्व वाया गेलेले आहे.त्यामुळे पंचनाम्याचा फार्स न करता अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत सरकारने केली पाहिजे कोकणात आणि निसर्ग चक्री वादळाचा फटका बसल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेषबाब म्हणून वाढीव मदत जाहीर केली होती याच धर्तीवर मराठवाड्यातहि वाढीव मदत देण्याची मागणी सर्वांनी केली आहे. मुख्यमंत्री हे पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.अशा हृदय द्रावक बातम्या वाचून व दुरदर्शन वरील दृश्य पाहून दसरा दिवाळी सणापूर्वी पिकांचे उत्पादन होऊन चार पैसे हातात पडतील मुलाबाळांचे समवेत सण साजरा करता येतील पण जगाचा पोशिंद्या शेतकरी राजाची सर्व स्वप्नेच धुळीला मिळालेली आहेत.आशेची दुर्दशा झाली आहे.शेतकरी राजा हा काही खाजगी सावकार,विकास सेवा सोसायटी किंवा बँका यांचेकडून कर्ज काढून निसर्गाच्या भरवशावर मातीत बियांची पेरणी करत असतो पण निसर्ग त्या शेतकरी राजाला कधी दगा देईल ते सांगता येत नाही. त्यामुळे हातातोंडाला आलेला घास निसर्गाने काढून घेतलेला आहे.त्यामुळे तो शेतकरी राजा आपण घेतलेले कर्ज कसे फेडायचे याचीच त्याला काळजी लागून रहात असते.सर्व कर्ज शेतीतील येणाऱ्या पिंकांचे उत्पन्न या भरवशावर काढलेले असल्यामुळे शेतकरी राजा खचला जातो.
हळव्या मनाचे शेतकरी आत्महत्या हा यावर एकच रामबाण उपाय समजून आता पर्यंत अशा आलेल्या संकटात हजारो शेतकरी यानी पुर्वी जगाचा निरोप घेतलेला आहे.पण आत्महत्या करणे हा चुकीचा निर्णय आहे संकटे ही येत असतात जात असतात.जगाच्या पोशिंदाने असे खच्चून न जाता येणाऱ्या संकटास धैर्याने तोंड दिलेच पाहिजे.आपले मायबाप सरकार सुद्धा जास्तीत जास्त मदत करणेचा प्रयत्न नक्कीच करेल अशी आशा वाटते.
सरकारने अशा जगाचा पोंशिंदा असणारा शेतकरी पुन्हा उभा राहणेसाठी शेतकरी यांच्या लाभाच्या योजना सुरू केल्या पाहिजेत जशी ही मदत सत्वर केलीच पाहिजे याशिवाय बिन व्याजी कर्ज,पूर्वी दिलेले कर्ज माफI करणे,मुलांची परीक्षा फी माफ करणे,मोफत धान्य वाटप केले पाहिजे.कोरोनाच्या काळात ज्या काही सवलती दिल्या त्या शेतकऱ्यांना दिल्या पाहिजेत.पशु पालन,कुकुट पालन अशा स्वावलंबी किंवा ग्रामीण उधोगसाठी मदत केली पाहिजे तरच माझा जगाचा पोशिंदा पुन्हा उभा राहू शकेल.नुकतीच काल आपण माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती २ ऑक्टोबर ला साजरी केली आहे त्यांनी म्हटलेलं आहे ” जय जवान जय किसान ” किती आता योग्य आहे.देशाचा रक्षण करणारा तो जवान आणि देशाचे पोषण करणारा तो किसान.हे आपल्या देशाचे आधारस्तंभ आहेत असे त्यांना म्हटले तर वावगे होणार नाही.कारण दिवस रात्र देशाचे सरहद्दीवर डोळ्यात तेल घालून दऱ्या खोऱ्यात राहून आपले रक्षण करतो त्याचे जीवावर आपण निर्धास्त राहतो आणि दुसरा हा शेतकरी हा सुद्धा उन्हातान्हात शेतात राबून धान्य पिकवतो त्यामुळेच आपणास खावयास मिळते म्हणूनच त्याला जगाचा पोशिंदा म्हटलेले आहे.जवान व किसान सुखी असेल तर आपला देश सुखी राहील.
आपली शेती ही निसर्गावर अवलंबून असते चांगला वेळेवर पाऊस पडला केवळ पाऊस पडून उपयोग नाही योग्य प्रमाणात पडला पाहिजे तो अवेळी नसला पाहिजे पण अलीकडे निसर्गाचे संतुलन बिघडलेले आहे ते बिघडण्यास आपणच मानव जबाबदार आहोत.जसे सध्या हवामान बदलामुळे अनेक अभूतपूर्व बदल पृथ्वीवर घडू लागले आहेत. हिम शिखरे वितळू लागली आहेत जिथे बारा महिने सुखा दुष्काळ होता तिथे अतिवृष्टी होऊन महापूर,ढगफुटी,चक्री वादळे होऊ लागली आहेत.मानावाने आपल्या जंगल तोडून चंगळवादा साठी निसर्गाला ओरबडण्याचे काम सुरू केले आहे. निसर्गाचा जसजसा -हास होईल तसे परिणाम मानवाला भोगावे लागणार आहेत. हे कटू सत्य आहे.मग राज्याचा विचार केला तर कधी सांगली, कोल्हापूर कधी चिपळूण कोकण किनारपट्टी तर कधी आताचा मराठवाडा विदर्भ अशा संकटांना आपणास सामोरे जावेच लागेल हातपाय गाळून बसता येणार नाही.आज पर्यंत माझा शेतकरी राजा संकट झेलत व पेलत आलेला आहे.हेहि संकट पेलणारच आहे त्यासाठी “शासनाने शेतकऱ्यास मदत दिली पाहिजे.” शेतकरी पुन्हा उभा राहील .
लेखक
जी.एस.कुचेकर पाटील
भुईंज तालुका वाई जिल्हा सातारा
मो.न. ७५८८५६०७६१.

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *