ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सरकारने महाराष्ट्राला वाईनच्या नावावर मद्यमय करू नये

February 2, 202215:29 PM 41 0 0

आवश्यक वस्तूंच्या दुकानात कशी काय वाईन? वाईन एवढी आवश्यक झाली काय? राज्य सरकारचे डोके तरी ठिकाणावर आहे का? ज्या दुकानात छोटी-छोटी मुलं, महीला आणि हसता खेळता परिवार अती आवश्यक व आवश्यक वस्तूंची खरेदी करायला जातात तीथेच आता वाईन मिळणार!हे चाल्लय तरी काय?परंतु आता आघाडी सरकारने किराणा दुकानात वाईन विक्री खुली केल्याची बातमी समजताच येताच अनेक क्षेत्रातून सरकारवर टिकेचे झोड येतांना दिसत आहे.माझ्यामते वाईन हा दारूचाच प्रकार आहे.त्यामुळे सरकारने वाईन वेगळी व दारू वेगळी अशी परिभाषा राज्यांच्या जनतेला शिकवु नये व दिशाभूल करू नये.समाजात सुधारणा व्हावी म्हणून महिलांकडून दारूबंदीची आवाज वेळोवेळी नेहमी उठतांना दिसते.आघाडी सरकारने तर वाईन किराणा दुकानात आणल्याने लहान मुले-मुली, विद्यार्थी, महीला यांच्यावर काय परिणाम होईल याचा विचार निर्णय घेण्याआधी का केला नाही? दारू, वाईन,व्हिस्की ही सर्वच नशेली वस्तू आहे.त्यामुळे समाजातुन यांचा बहिष्कार होने सहाजिकच आहे आणि व्हायला सुध्दा पाहिजे.सरकार वाईन किराणा दुकानात विकणार मग मुलांनी चॉकलेट घ्यायला पाहिजे की वाईन यांचा विचार सरकारने गांभीर्याने केला पाहिजे.कारण किराणा दुकानात वाईन किंवा दारू विक्री हि समाजासाठी चिंतेचा आणि गंभीर विषय आहे.राज्यात बेरोजगारी झपाट्याने वाढत आहे.महागाईने कळस उभा केला आहे,करोनाने अनेकांची घरे उद्ध्वस्त झाले व जीवाला कंटाळून अनेक लोक वेदनांनी ग्रस्त झाले. अशा अनेक जटिल समस्या राज्यात असतांना सरकारने आपली तिजोरी भरण्यासाठी वाईन किराणा दुकानात सुरू करून सर्वसामान्यांनचे आयुष्य बरबाद करणार काय? सरकारने आपल्या निर्णयावर पुन्हा विचार करण्याची गरज आहे.कारण वाईनची किराणा दुकानातील विक्री म्हणजे खुलेआम नशाचीच विक्री म्हणावी लागेल व ही घातक सिद्ध होईल.वाईन म्हणजे दारू नाही ही सरकारची चुकीची कल्पना आहे.वाईनमध्ये 25 टक्के अल्कोहोल असते, व्हिस्की,रम व व्होडका यात 40 टक्के अल्कोहोल असते या मद्यासारखी नशा वाईन प्यायल्या नंतर येऊ शकते.सरकार शेतकऱ्यांच्या फायद्याची गोष्ट खरोखरच करायची असेल तर अनेक वर्षांपासून ज्वारीचे पीक कमी होत आहे त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, महाराष्ट्रातील संपूर्ण फळांना सरकारने खुली बाजारपेठ ठेवायला पाहिजे जेनेकरून त्यांना योग्य भाव मिळुन शकेल.राज्यात चना, गहू,तुर, कापूस, सोयाबीन,ज्वारीचे इत्यादी अनेक पीक दिवसेंदिवस कमी प्रमाणात होत आहे याकडे सरकारने जातीने लक्ष देण्याची गरज आहे.सरकार किराणा दुकानात वाईन विकण्याला सुरूवात करणार आणि वाईन कारखाने राजकीय पुढाऱ्यांचे रहाणार मग काय सरकार शेतकऱ्यांना भोपळा देणार काय? सरकार स्वतःच्या स्वार्थासाठी शेतकऱ्यांना फायद्याची गोष्ट करीत असल्याचे दिसत आहे.हायवे वर दुर्घटना होऊ नये म्हणून बार, वाईन शॉप 500 मिटर दुसरीवर असावे असाही कायदा आहे.मग वाईन जर किराणा दुकानात उपलब्ध झाली तर दुर्घटना वाढणार नाही काय? कोणतीही नशा असो ती वाईटच असते.त्यामुळे महाराष्ट्र सरकारने वाईनला चांगले दाखवून डोक्यावर नाचवू नये.आपनाला वाईन वाईट किंवा नशेली वाटत नसेल तर याची सुरुवात सरकारने व वाईन समर्थकांनी आपल्या घरापासूनच केली पाहिजे.परंतु सरकारने वाईनच्या नावावर शेतकऱ्यांची फसवणूक करू नये व सर्वसामान्यांना नवीन व्यसन लावण्याची चुकीसुध्दा करू नये.सरकारला शेतकऱ्यानाची खरोखरच जान असेल तर शेतकऱ्यांना सरळ हातानी मदत करण्याची गरज आहे.आज महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी निसर्गावर अवलंबून असते त्याला पेरणी पासून तर माल निघेपर्यंत उन, पाऊस, थंडी, अकाल, अकाली पाऊस, गारपीट यांचा सामना करावा लागतो त्यानंतर त्यातून जे काही मिळते ते त्यांच्या नशीबाने मिळत असते.त्यातुनही त्याचा उदरनिर्वाह होत नाही अशा परिस्थितीत आपण शेतकऱ्यानी आत्महत्या करण्याच्या अनेक घटना उघड्या डोळ्यांनी पहाल्या आहेत.अशा परिस्थितीत सरकारला शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने मदत करायची असेल तर 500 युनिट पर्यंत विज मोफत द्यावी, राज्यातील शेतकऱ्यांना पेरणी करीता बी-बियाने मोफत द्यावे, प्रत्येक शेतकऱ्याना दरमहा 5 हजार रुपये मानधन रूपाने द्यावे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल व त्यांची आर्थिक परिस्थिती उंचावेल.सरकारला वाईन सर्वसामान्यांच्या व शेतकऱ्यांच्या हिताची वाटत असेल तर गांजा,अफु,मोहफुल लागवडीची खुली परवानगी शेतकऱ्यांना दिली पाहिजे.महाराष्ट्र सरकारने सुपरमार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.हा निर्णय महाराष्ट्रातील जनतेसाठी अतिशय दुर्दैवी आहे.वाईन हे कायद्यानुसार प्रतिबंधित उत्पादनात मोडते.हा मद्याचाच प्रकार आहे.असे सरकारी सुत्रांकडून सांगण्यात येते.त्याचप्रमाणे वाईन पिण्याचा परवाना वयाच्या 25 व्या वर्षे मिळतो.असे एक्साईज आयुक्तांचे म्हणने आहे.यावरून स्पष्ट होते की वाईन ही नशेली वस्तू आहेच.येवढ्या सर्व अटी असतांना सरकारला सुपर मार्केट व किराणा दुकानातून वाईन विक्रीची कल्पना कशी काय सुचली? सरकारच्या या खेळखंडोब्यावरून असे दिसून येते की सरकारी तिजोरी भरण्यासाठी हा महसूल जमा करण्याचा नविन मार्ग असावा.परंतु असा महसूल जमा करण्याच्या मार्गाला महाराष्ट्रातील जनता कदापि समर्थन करणार नाही.जर सुपर मार्केट व किराणा दुकानात वाईन विक्रीला आली तर मग पिण्याच्या अटी,नियम, कायदा या संपूर्ण गोष्टी गौण होतील.वाईन सारख्या वस्तू किराणा दुकानात भेटायला लागल्या तर कमी वयातील मुलं-मुली सुध्दा सेवन करू शकतात याला नाकारता येत नाही व याला जबाबदार स्व:या सरकारच राहिल.त्यामुळे सावधान सरकार! सरकारला मी आग्रह करेल की आपण वाईनच्या बाबतीत घेतलेला निर्णय ताबडतोब मागे घ्यावा व समाजात जे असंजस्यतेचे वातावरण निर्माण झाले आहे त्याला ताबडतोब शांत करावे.राज्याच्या 12 कोटी जनतेची जिव्हाळ्याची लालपरी अजुन पर्यंत पुर्व पदावर आलेली नाही.या अत्यंत महत्त्वाच्या कामाकडे दुर्लक्ष करून किराणा दुकानात वाईन विकण्याची गोष्ट सरकार करीत आहे ही अत्यंत दुर्दैवी बाब म्हणावी लागेल.करोना काळात सरकारने शाळा-महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना फी मध्ये 50 टक्के सुध्दा सवलत दिली नाही व फी चा संपूर्ण भुर्दंड सरकारने पालकांच्या मस्तकी मारला आणि सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली.परंतु आता तिजोरी खालीच्या नावावर महसूल आला पाहिजे म्हणून सर्वसामान्यांची, शेतकऱ्यांची गळचेपी किंवा दिशाभूल करने हे सरकारचे योग्य धोरण नाही.त्यामुळे वाईनच्या बाबतीत आघाडी सरकारने घेतलेला निर्णय ताबडतोब मागे घ्यावा.

लेखक.
रमेश कृष्णराव लांजेवार.
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर)
मो.नं.9921690779, नागपूर.

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *