ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर शिवसेनेच्या वतीने घेण्यात आल्या आढावा बैठका जास्तीत-जास्त ग्रामपंचायतींवर भगवा फडकविण्याचे आव्हान

December 31, 202016:44 PM 86 0 0

जालना (प्रतिनिधी)-जालना व बदनापूर तालुक्यातील होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वच ग्रामपंचायतींवर भगवा फडकविण्यासाठी कामाला लागा असा आदेश माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर व जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी आज जालना व बदनापूर येथे आयोजित शिवसेना प्रमुख पदाधिकाNयांच्या बैठकीदरम्यान दिले. जालना तालुक्यातील ८६ व बदनापूर तालुक्यातील ६१ ग्रामपंचायत निवडणुकीनुषंगाने आज ३० डिसेंबर रोजी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, माजी आमदार संतोष सांबरे, उपजिल्हाप्रमुख पंडीत भुतेकर, भगवान कदम, तालुकाप्रमुख संतोष मोहिते, जयप्रकाश चव्हाण, हरिभाऊ पोहेकर, हरीहर शिंदे, बबनराव खरात, पंचायत समिती सदस्य जर्नाधन चौधरी सुनिल पाखरे यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर म्हणाले की, ग्रामपंचायतीच्या निवडणुका या कार्यकत्र्यांच्या निवडणुका असून त्यांना गाव पातळीवर अत्यंत महत्व आहे. राज्यात सरकार आपले असून भविष्यात जास्तीत-जास्त ग्रामपंचायती ताब्यात घेतल्यास कार्यकत्र्यांना आपआपल्या गावांचा विकास करण्याची मोठी संधी मिळणार आहे. पक्षाच्या आदेशाप्रमाणे कार्यकत्र्यांनी स्थानिक पातळीवर इतर पक्षासोबत आघाडी शक्य नसल्यास अशा ठिकाणी आपले शिवसेनेचे पॅनल उभे करण्याचे आदेश दिले आहेत. त्या पद्धतीने निवडणुका लढाव्यात. जास्तीत-जास्त ग्रामपंचायतीवर भगवा फडकवावा, असे आवाहन केले. जालना-बदनापूर येथील बैठकीत बोलतांना शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर म्हणाले की, ग्रामपंचायतीच्या निवडणुका शिवसैनिक व कार्यकत्र्यांनी अत्यंत ताकदीने लढाव्यात. आपले सरकार आहे, त्यामुळे जास्तीत-जास्त ग्रामपंचायती आपल्या ताब्यात कशा आणता येतील, यासाठी कसोसीने प्रयत्न करावेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगले व लोकहिताचे निर्णय करीत आहे. सरकारच्या कार्याची माहिती या निवडणुकीच्या निमित्ताने लोकांपर्यंत घेवून जा, त्याचा फायदा आपणास नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही, असेही अंबेकर म्हणाले. बैठकीला मार्गदर्शन करतांना माजी आमदार संतोष सांबरे म्हणाले की, बदनापूर मतदार संघ हा शिवसेनेचा बाल्लेकिल्ला असून जिल्हा परिषद, पंचायत समित्या शिवसेनेच्या ताब्यात आहेत. जास्तीत-जास्त ग्रामपंचायतीही ताब्यात घेतल्यास विकास कामे अत्यंत गतीने करता येतील. यावेळी मोठ्या संख्येने, ,पदाधिकारी व शिवसैनिकांची उपस्थिती होती. यावेळी बी.टी. शिंदे, वैâलास चव्हाण, गणेश डोळस, रविकुमार बोचरे, राजेंद्र जNहाड, मुरलीधर थेटे, प्रभाकर घडलिंग, बाबुराव कायंदे, भगवान अंभोरे, कडुबा इंदलकर, ब्रम्हा वाघ, सखाराम गिराम, हरी शेळके आदींची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *