जालना (प्रतिनिधी) जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 12 डिसेंबर शनिवार रोजी दुपारी 12 वा. येथील भगवान सेवा मंगल कार्यालय, शनिमंदीर जुना जालना येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने श्रीमती सोनिया गांधी यांचा वाढदिवस विविध सामाजीक उपक्रमांच्या माध्यमातून दि. 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिवस ते 20 डिसेंबर पर्यंत साजरा करण्याचे आयोजन आहे. या अनुषंगाने शनिवार रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचे उद्घाटन आ. कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख हे उपस्थित राहणार आहे. याप्रंसगी आजी – माजी प्रदेश पदाधिकारी, माजी जिल्हाध्यक्ष, विविध आघाडीचे जिल्हाध्यक्ष यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र राख, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, गटनेते गणेश राऊत, जिल्हा उपाध्यक्ष विजय चौधरी, राम सावंत, अरूण घडलींग आदींनी केले आहे.
या शिबीराचे प्रकल्प प्रमुख म्हणून नगरसेवक शेख शकील, गणेश चौधरी, अरून घडलींग, चंद्रकांत रत्नपारखे हे काम पाहणार असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
Leave a Reply