ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जगासाठी पाकिस्तानातील महाप्रलय हा तर ट्रेलर आहे, पिक्चर आणखी बाकी आहे सावधान

September 5, 202213:17 PM 9 0 0

पाकिस्तानच्या महापुराने जगातील संपूर्ण देशांना सुचक इशारा दिला आहे की,आतातरी सावधान व्हा अन्यथा  विनाश अटळ आहे.भविष्यात जगात पुढेचालून अति महाभयानक स्थिती निर्माण होवू शकते.त्याची सुरूवात पाकिस्तानापासुन झाली आहे आणि ही जगासाठी धोक्याची घंटा आहे.पाकिस्तानात विनाशकारी महापुरामुळे जनजीवन कोलमडले असुन तब्बल एक तृतियांश भाग जलमग्न झाला आहे.हा संपूर्ण प्रकार हवामानातील बदलामुळे झालेला आहे.पाकिस्तानात आलेला महापूर ही जगासाठी विनाशाची सुरूवात असुन आगामी काळात हवामानात होणारा बदल हा अधिक धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा ठरू शकतो.पाकिस्तान आणि जगातील अन्य देशांत जे काही महाप्रलय,भुकंप, सुनामी,अतिउष्णता,अतिथंडी येत  आहे हे सर्व हवामान बदलाचे  वाईट परिणाम म्हणावे लागेल.कराचीमध्ये पाच वर्षांपूर्वी उष्णतेची लाट आली आणि ती जीवघेणी ठरली.कारण त्याचा सामना करण्यासाठी पाकिस्तानची कोणतीही तयारी नव्हती.यामुळे सुमारे दोन हजारहुन अधिक नागरिकांना उष्णतेच्या लाटेमुळे आपले प्राण गमवावे लागले.म्हणजेच पाकिस्तान असो वा जगातील कोणताही देश असो या सर्वांवर येणारा काळ महा भयावह राहु शकतो याला नाकारता येत नाही.पाकिस्तानच्या मोठ्या भागावर चीनचा कब्जा आहे.

या संपूर्ण भागात चीनने खणन करून निसर्गाशी मोठ्या प्रमाणात छेडछाड केल्यामुळेसुध्दा महापूराचा फटका पाकिस्तानला भोगावा लागत आहे.त्याचप्रमाणे पाकिस्तान हे आता “आतंकीस्तान”झाले असल्याने व अनेक भागात आतंकवाद्यांचे वर्चस्व आहे.त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पाकिस्तान सरकार कोणतेही पाऊल उचलु शकत नाही ही सुद्धा पाकिस्तानसाठी मोठी शोकांतिका आहे.त्यामुळे वृक्षलागवडीकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही. पाकिस्तानमध्ये पर्यावरण नावाची भाषांचं नामशेष झाली असून आतंकवाद व खुनखराब्याचा देश बनला आहे.दिवसेंदिवस पाकिस्तान रेगीस्तान बनत असल्याने  महापुराचा व महाप्रलयाचा धोका वाढत आहे.पाकिस्तानमध्ये महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून लाखो नागरिक बेघर झाले आहेत.आता आलेला महापुर हा पाकिस्तानच्या इतिहासातील पहिलाच विनाशकारी महापुर असल्याचे सांगितले जाते.या विनाशकारी पुरामुळे 3 कोटी 30 लाखाहुन अधिक लोक विस्थापित झाले आहे व या महाप्रलयाच्या दरम्यान आतापर्यंत 1500 हुन अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.तर हजारो जखमी सुध्दा झाले आहे.त्याचप्रमाणे हजारो जनावरांना सूध्दा आपले प्राण मुकावे लागले.महापुरात उध्दवस्त झालेल्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी पाकिस्तानला 10 अब्ज डॉलरहुन अधिक मदतिची गरज आहे.निसर्गाच्या वाढत्या बदलामुळे व वाढत्या तापमानामुळे असा भिषण पुर आल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.पाकिस्तानमध्ये महापुरामुळे हजारो एकर शेतजमीन पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अशा परिस्थितीत पाकिस्तानमध्ये येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात अन्न-धान्याचा तुटवडा पडु शकतो.पहिलेच पाकिस्तान कंगाल देश आहे आणि आता महापुरामुळे त्याला बेघर केल्याचे दिसून येते.पाकिस्तानातील पुरस्थीतीमुळे अनेक पिके पाण्याखाली गेली असल्याने पाकिस्तान भारताकडे मदतीची गुहागर करीत आहे.पुरामुळे पाकिस्तानमध्ये निर्माण झालेला महागाईचा आगडोंब निवळण्यासाठी भारताबरोबर व्यापाराचा मार्ग खुला करण्याची मागणी जोर धरत आहे.विशेषत: कांदा, टोमॅटो यासारख्या जीवनावश्यक वस्तू भारतातुन आयात करता येईल याकडे पाकिस्तानचे लक्ष लागले आहे.कारण गेल्या30 वर्षातील पावसाचे सर्व विक्रम मोडत यंदा पाकिस्तानात पाऊस झाला आहे.त्यामुळे सर्वच भागांना पुराने वेढलेले आहे.पाकिसतानची भयावह स्थिती पाहता अनेक दुष्मण राष्ट्रसुध्दा  मदतीसाठी धावून आले आहे.त्यामुळे पाकिस्तानने आतातरी सुधरायला  हवे व शेजारी राष्ट्रांशी मित्रत्वाचा हात सामोरं करून एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायला हवे.

चीनने श्रीलंकेला भिकेला लावले आणि आता पाकिस्तानात सुध्दा भिकेच्या वाटेवर आहे.त्यामुळे “सुधरजा पाकिस्तान देर आये दुरूस्त आये”पाकिस्तानने लक्षात ठेवले पाहिजे की महापुर असो वा कोणताही महाप्रलय असो जो चीन सोबत दोस्ती करतो त्याचे प्रायश्चित्त महाभयानक विनाशाच्या दिशेने वाटचाल करणारे असतात याचे जिवंत उदाहरण जग उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.चीन हा जगाचा हत्यारा आहे त्यामुळे त्यांचे प्रायश्चित्त तो तर भोगतच आहे परंतु मित्र राष्ट्रांना सुध्दा भोगण्यास भाग पाडत आहे.चीनला दरवर्षी महापुराशी सामना करावा लागतो.त्यामुळे जगातील राष्ट्रांनी चीन पासून नेहमीच सावध रहाले पाहिजे.पाकिस्तानमधील महाप्रलय पहाता जगातील संपूर्ण देशांनी निसर्गाची जोपासना करण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात वृक्षलागवडीकडे लक्ष केंद्रित करायला हवे.यामुळे येणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरेल व वाढत्या तापमानावर सुध्दा आळा बसण्यास मोठी मदत होईल व महाप्रलयापासुन आपल्याला बचाव करता येईल.त्यामुळे जगाने पर्यावरण वाचविण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करण्याची गरज आहे.

रमेश कृष्णराव लांजेवार

मो.नं.9921690779, नागपूर.

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *