आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांनी सर्वसामान्यांना समजेल, अशा सोप्या भाषेत आयुर्वेदावर विपुल लेखन आणि संशोधन करून आयुर्वेदाचा प्रसार प्रचार केला. हिंदु धर्मातील ‘गर्भसंस्कार’ या विधीला नवसंजीवनी देण्याचे कार्यही त्यांनी केले. त्यांनी आयुर्वेदावर केलेले संशोधन आणि लेखन पुढील अनेक पिढ्यांना दिशादर्शन करणारे आहे. विज्ञानाचे शिक्षण घेऊनही आयुष्यभर अतिशय सात्त्विक जीवन जगले.
बालाजी तांबे यांच्या निधनाने आयुर्वेदाची मोठी हानी झाली असून आयुर्वेदाचा एक मोठा संशोधक हरपला आहे, असे सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी म्हटले आहे. बालाजी तांबे यांनी जीवनात जाणलेले आयुर्वेदाचे महत्त्व आपणही जाणून घेऊन त्याचा प्रसार-प्रचार करण्याचा निश्चय करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही श्री. राजहंस यांनी म्हटले आहे. सनातन संस्था तांबे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
Leave a Reply