ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पाऊसाचा जोश अन…आम्हा विद्युत लाभार्थ्यांची उडते झोप…

July 13, 202216:08 PM 17 0 0

उरण (तृप्ती भोईर) : उरण मधील करंजा रोडवरील अंबेनगर रहिवाशांची आज आठ दिवस होवून गेले पुरती झोप उडाली आहे याला कारण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळ उरण यांच्या अखत्यारीत असलेल्या अंबेनगर करंजा रोड येथील विद्युत डिपी वरील ट्रान्सफॉर्मर आज आठ दिवसांपूर्वी जोरात पडलेल्या पाऊसाने उडाला आहे त्यामुळे अंबेनगर येथील रहिवासी सोमवार दिनांक ४ जुलै २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता लाईट गेली ती मंगळवारी रात्री पर्यायी व्यवस्था म्हणून तात्पुरती या विभागासाठी लाईट जोडली आहे.

या गोष्टीला आज आठ दिवस होऊन गेले आहेत पण नवीन ट्रान्सफॉर्मर काही बसवला जात नाही संबंधित विद्युत संपर्क नंबरवर फोन केला असता , ट्रान्सफॉर्मर न बसविण्याचे नेमके कारण संबंधित कर्मचारी सांगत नाहीत येथील नागरिकांनी फोन करून विचारले असता वेगवेळी उत्तरे मिळत आहेत.

या सर्वांचा परिणाम म्हणजे तात्पुरती ही जोडलेली लाईट आमच्या विद्युत उपकरणांसाठी घातक आहे कमी होल्टेज मिळत असल्याने इन्व्हर्टर ची बॅटरी , ओव्हन, फ्रीज, वॉशिंग मशीन, टिव्ही, गिझर अशा उपकरणांवर फार मोठा परिणाम होत आहे . कमी जास्त , दाबामुळे अशी उपकरणे नादुरुस्त होत आहेत आठ दिवस होऊन गेले तरी या समस्येवर उपाययोजना होत नसेल तर आम्ही सामान्य जनतेने कुणाकडे जावे?पाऊस, मच्छर आणि लाईटच्या या अनियमिततेमुळे सध्या अंबेनगर रहिवाशांची झोप उडाली आहे. प्रत्येक रहिवासी या विद्युत वितरण मंडळाच्या कारभाराविषयी नाराज आहे त्वरित यातुन मार्ग काढावा नाहीतर अंबेनगर महिला विद्युत मंडळ उरण च्या कार्यालयात मोर्चा नेणार असल्याचे बोलले जात आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *