ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पत्नीची हत्या करुन पतीने मृतदेह जंगलात जाळला

June 30, 202112:29 PM 102 0 0

हैदराबाद : बायकोची हत्या केल्यानंतर पतीने तिचा मृतदेह सूटकेसमध्ये टाकून जाळल्याची घटना उघडकीस आली आहे. कोरोना डेल्टा प्लस व्हेरिएंटची (Delta Plus variant) लागण झाल्यानंतर पत्नीचा मृत्यू झाल्याचा बनाव त्याने नातेवाईकांसमोर रचला. मात्र सीसीटीव्हीमुळे पतीचं पितळ उघडं पडलं. आंध्र प्रदेशातील तिरुपतीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. आरोपी पती श्रीकांत रेड्डी हा आंध्र प्रदेशातील कडपा जिल्ह्यातील बुद्वेलचा रहिवासी आहे. चित्तूर जिल्ह्यातील रामसमुद्रममध्ये राहणाऱ्या 27 वर्षीय भुवनेश्वरीसोबत 2019 मध्ये त्याचा प्रेम विवाह झाला होता. दोन-तीन महिन्यांपूर्वीच रेड्डी दाम्पत्य तिरुपतीमधी डीबीआर रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाले होते. त्यांना दीड वर्षांची मुलगीही आहे.
नोकरी गेल्यानंतर दाम्पत्यात वाद
भुवनेश्वरी ही सॉफ्टवेअर इंजिनिअर होती. हैदराबादमधील एका आयटी कंपनीत ती नोकरी करत होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ती सध्या घरातून काम (वर्क फ्रॉम होम) करत होती. मात्र 2020 मध्ये श्रीकांतची नोकरी गेली. त्यानंतरच दोघांमध्ये वाद वाढले होते. वादावादीतून श्रीकांतने पत्नीची हत्या केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर त्याने भुवनेश्वरीचा मृतदेह एका बॅगेतून जंगलात नेला आणि निर्जन जागा पाहून जाळून टाकला.

https://indianfast.com/

https://indianfast.com/

जंगलात मृतदेह जळालेल्या अवस्थेत
23 जूनला पोलिसांना भुवनेश्वरीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतले. त्यात दिसलेल्या टॅक्सी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि चौकशी केली.
सीसीटीव्हीमध्ये काय दिसलं
त्याच वेळी, श्रीकांतच्या अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही फूटेजमध्ये 22 जूनला तो आपल्या मुलीला कडेवर घेऊन बाहेर जाताना दिसला. त्यावेळी लाल रंगाची सूटकेस तो घरातून ओढत बाहेर पडताना दिसत होतं. ही सूटकेस घेऊन तो टॅक्सीमध्ये बसला. टॅक्सी तिरुपतीमधील रुया सरकारी हॉस्पिटलजवळी निर्जन जागेवर त्याने थांबवली. त्यानंतर सूटकेसमधून मृतदेह बाहेर काढत पेट्रोल टाकून त्याने जाळला. लाल सूटकेस घरी परत आणताना वजनाने हलकी असल्याचं सीसीटीव्ही फूटेजमध्ये जाणवत होतं.
कोरोनाने मृत्यूचा बनाव
घरी आल्यावर पत्नी भुवनेश्वरीच्या फोनवर तिच्या माहेरहून फोन आले होते. त्यामुळे श्रीकांतने सर्वांना फोन करुन सांगितलं की तिला कोरोना डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण झाली होती, मात्र हैदराबादमध्ये उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. नातेवाईकांचा श्रीकांतच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. भुवनेश्वरीची भाची ममता ही कर्नूल जिल्ह्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. तिने श्रीकांतच्या अपार्टमेंटचे सीसीटीव्ही फूटेज तपासले, तेव्हा या घटनेचा उलगडा झाला. परंतु या घटनेनंतर आरोपी श्रीकांत परागंदा झाला आहे.

Categories: राष्ट्रीय
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *