ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

भारतीय मराठा महासंघाने अहिरे येथील अपघात ग्रस्त महिलेला केली आर्थिक मदत

September 5, 202212:57 PM 8 0 0

  खंडाळा (विदया पडळकर) : भारतीय मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा श्री सागर दादा पवार यांच्या वतीने खंडाळा तालुक्यातील अहिरे गावांमधील अपघातग्रस्त महिलेच्या घरी जाऊन विचार पुस केली व घडल्या प्रकाराबद्दल व त्या कुटुंबाची विदारक सत्य परिस्थिती पाहिली आणि मन हेलावून गेले आधीच त्या कुटुंबाची दयनीय अवस्था त्यात कर्त्या महिलांच्या अपघात यामुळे ते कुटुंब पुर्णता हातबल झाले होते ही माहिती मराठा महासंघाच्या अध्यक्षांच्या कानी पडताच अपघातग्रस्त महिलेच्या घरी जाऊन भेट घेतली त्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात आली.

यावेळी उपस्थित जिल्हा अध्यक्ष विक्रम वाघ कामगार जिल्हाध्यक्ष स़तोष ननावरे तालुकाध्यक्ष अतुल भोईटे  इ मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा श्री सागर दादा पवार यांनी कुटुंबाला सांगितले की तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर मला फोन व प्रत्यक्ष येऊन भेटा यावेळी कुटुंबातील व्यक्तीचे मन गहिवरून आले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *