ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

भारताच्याच नव्हे तर जगाच्या संस्कृतीवर सम्राट अशोकाचा प्रभाव – महेंद्र शेगावकर

April 22, 202115:12 PM 135 0 0

नांदेड – सम्राट अशोक हा क्रूर, कुरुप होता हा अशोकाबद्दलचा अपप्रचार असून सम्राट अशोक हा सौंदर्यवान, सत्यवादी, प्रेमळ तसेच दूरदृष्टी असलेला देवनामप्रिय चक्रवर्ती सम्राट होता. चक्रवर्ती सम्राट अशोकांची तुलना, अलेक्झांडर द ग्रेट, ऑगस्टस सीझर, चेंगीजखान, तैमूर, रशियाचा पहिला पीटर किंवा पहिला नेपोलियन यांच्याशी केली जाते. परंतु अशोक श्रेष्ठच होता. त्याच्या अमोघ कार्याचा केवळ भारतावरच प्रभाव होता असे नाही तर जगाच्या संस्कृतीवर अशोकाची मोहोर उमटलेली दिसते असे प्रतिपादन अशोककालीन ऐतिहासिक साहित्याचे अभ्यासक महेंद्र शेगावकर यांनी केले. ते अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने आॅनलाईन पद्धतीने आयोजित विशेष व्याख्यानप्रसंगी बोलत होते. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष अशोक बुरबुरे, कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक प्रशांत वंजारे, समन्वयक गंगाधर ढवळे, साऊल झोटे, भैय्यासाहेब गोडबोले, शालिक जिल्हेकर, सज्जन बरडे, किसनराव पतंगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त ‘मौर्यकालीन इतिहासाच्या पाऊलखुणा’ या विषयावर अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने व्याख्यानासाठी ख्यातकीर्त संशोधक व अभ्यासक महेंद्र शेगावकर यांना पाचारण करण्यात आले होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, आजचा पाकिस्तान, अफगाणिस्तान पूर्वेकडे बांग्लादेश ते दक्षिणेकडे केरळ पर्यंत तसेच नेपाळ, भूतान इराण, ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशांमध्ये अशोकांच्या साम्राज्याच्या सीमा होत्या. अत्यंत शूर असे सम्राट अशोक आपल्या आयुष्यात एक ही युद्ध हरले नाहीत. कलिंगाच्या युद्धातील महासंहारानंतर कलिंग काबीज झाला, जे कोणत्याही मौर्य राज्यकर्त्यास पूर्वी जमले नव्हते. हे एक व्यापारविषयक युद्ध होते. कलिंगाच्या युद्धात झालेल्या मनुष्यहानी पाहून त्यांनी प्रचलित वैदिक परंपरा झुगारून हिंसेचा त्याग केला आणि मानवतावादी बौद्ध धम्माचा स्वीकार केला व नंतरच्या आयुष्यात त्यांनी स्वतःला बौद्ध धम्माच्या प्रसारास समर्पित केले. अशोकांच्या संदर्भातील अनेक शिलालेख भारताच्या काना कोपऱ्यात सापडतात.
सम्राट अशोकांनी बौद्ध धम्म संपूर्ण आशिया खंडात तसेच इतर प्रत्येक खंडात पसरवला होता. त्यामुळे भारतासह जगावर अशोकाने आपला प्रभाव निर्माण केला होता.
अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सात दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. या व्याख्यानमालेलाही दर्शकांचा चांगलाच प्रतिसाद लाभला होता. या आॅनलाईन व्याख्यानाच्या कार्यक्रमास कविता कांबळे, डॉ. राजेंद्र गोणारकर, जगदीश पाटील, आतिश दीपंकर, रमेश बुरबुरे, शुभांगी जुमळे, मिलिंद सवाई, शरद सुधाकर, गोवर्धन इंगोले, कांचन मून, प्रशांत पाईकराव यांच्यासह राज्यभरातून अनेक अभ्यासक व चिंतकांची आॅनलाईन उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. सिमा मेश्राम, छाया खोब्रागडे, सुनंदा बोदिले, अरविंद निकोसे, सुरेश खोब्रागडे, अमृत बनसोड, देवानंद सुटे, यांच्यासह महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

सम्राट अशोककालीन ऐतिहासिक साधनांकडे दुर्लक्ष
अशोकाचा कालखंड हा अत्यंत समृद्धीचा होता. दंतकथांच्या आधारे इतिहास लिहिला जात नाही. मौर्यकालीन विशेषतः सम्राट अशोकाच्या संदर्भात व्हावे तितके संशोधन झालेले नाही अशी खंत महेंद्र शेगावकर यांनी व्यक्त केली. उत्खनन, चिन्हे, शिलालेख, स्तंभ, लिपिंचा अभ्यास, लेणी, प्रवासवर्णने यांच्या माध्यमातून अधिक संशोधन होणे आवश्यक आहे अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले की, बुद्ध , सम्राट अशोक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही सलग ऐतिहासिक मांडणी केली पाहिजे. भारतीय दंड संहिता ही सम्राट अशोकाच्या काळातच पहिल्यांदा निर्माण झाली. अशोकाच्या काळात ९१ टक्के लोक साक्षर होते. मौर्यकालीन लिपीतूनच आजची देवनागरी लिपी उत्क्रांत झाली आहे.

शिलालेख हे बौद्ध धम्माचा सांस्कृतिक वारसा
अशोककालीन शिलालेख म्हणजे बौद्ध संस्कृतीची ऐतिहासिक साधने आहेत. चिनी प्रवाशाने प्रवासवर्णन लिहून ठेवले नसते तर त्याप्रमाणे उत्खनन होऊ शकले नसते व आपल्याला सम्राट अशोकाचा इतिहासही कळू शकला नसता. सम्राट अशोकाचे शिलालेख तत्कालीन मौर्यलिपीचा अभ्यास करून आपण अभ्यास केला पाहिजे. संशोधन केलं पाहिजे. अशोकाचा इतिहास समजून घेण्यासाठी लेणी आणि लिपी महत्त्वाची. पुरातत्वीय पुरावे अभ्यासून आपण नव्यानं इतिहास मांडायला हवा होता. इतरांनी मांडलेल्या इतिहासावर आपण अवलंबून राहणं हे उपयोगाचं नाही. धम्म आणि धम्माची सांस्कृतिक विरासत याकडे आपण पाहिजे तसं लक्ष देऊ शकलो नाही, असेही ते म्हणाले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *