ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शिक्षक क्लब ऑफ जालना यांचा उपक्रम राज्यातील शिक्षकांना दिशादर्शक ठरेल – पालकमंत्री राजेश टोपे

August 7, 202114:03 PM 85 0 0

जालना – शिक्षकांनी शिक्षण देण्याबरोबरच समाजाप्रती आपलेही काही देणे लागते, समाजाप्रती आपली बांधिलकी, सामाजिक उत्तरदायित्व असले पाहिजे या पद्धतीचे कार्य 100 शिक्षक क्लब ऑफ जालना यांच्यावतीने करण्यात येऊन राज्यातील सर्व शिक्षकांना दिशादर्शक ठरेल असा आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात 100 शिक्षक क्लब ऑफ जालना यांच्यातवतीने कोरोना योद्धयांचा पालकमंत्री राजेश टोपे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार कैलास गोरंट्याल, आमदार निलेश लंके, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठज्ञेड, विजयअण्णा बोराडे, उद्योजक सुनिल रायठठ्ठा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, राजाभाऊ मगर, आर.आर. जोशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, कुठल्याही चांगल्या कामाची नोंद झाली तर अधिक जास्त प्रोत्साहन, प्रेरणा व ऊर्जा मिळते. कोरोना काळात चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याबरोबरच समाजहिताचे विविध उपक्रम काम 100 शिक्षक क्लब ऑफ जालना यांच्यामार्फत राबविण्यात येत असल्याबद्दल या क्लबचे अभिनंदन करत सन्मान केलेल्या सर्व कारोनायोद्धयांचा यातुन प्रेरणा मिळुन समाजाच्यादृष्टीने अधिक चांगल्या पद्धतीने काम व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करत विविध क्षेत्रामध्ये प्रत्येकाने आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली तर समाजव्यवस्था अधिक मजबुत होण्यास मदत हाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कोरोनाच्या अनुषंगाने जालना जिल्ह्यात कोव्हीड रुग्णांवर उपचार करण्यासाठी जवळपास 700 बेडची निर्मिती करण्यात येऊन रुग्णांना मुबलक प्रमाणात ऑक्सिजन, औषधी यांची कमतरता भासु न देता मराठवाड्यातील ईरत जिल्ह्यांच्या तुनलेन सर्वाधिक व्हेंटीलेटरही उपलब्ध करुन देण्यात आले. जालना येथे अत्यंत चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध करुन दिल्याने केवळ जालनाच नव्हे तर ईतर जिल्ह्यातील रुग्णांनीही जालना येथे येऊन उपचार घेण्यास पसंती दर्शविल्याचे सांगत कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठीही आरोग्य यंत्रणा सज्ज असुन 100 खाटांची क्षमता असलेल्या मॉड्युलर हास्पीटलचीही उभारणी करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात पुणे, ठाणे, नागपूर व रत्‍नागिरी या चार ठिकाणी प्रादेशिक मनोरुग्‍णालये कार्यरत असून सद्दस्थितीत मराठवाडा विभागासाठी एकही प्रादेशिक मनोरुग्णालय नाही. मानसिक रुग्णांचे आंतररुग्ण उपचार तसेच पुनर्वसन यासाठी होणारी गैरसोय टाळण्याकरीता तसेच मानसिक आरोग्य विषयक सुविधा मराठवाड्यातील जनतेला उपलब्ध होण्यासाठी जालना येथे ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली असुन जवळपास 104 कोटी रुपये खर्च करुन या ठिकाणी अद्यावत अशा रुग्णालयाची उभारणी करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.

अहमदनगर जिल्ह्यातील आमदार निलेश लंके यांनी कोरोना काळात रुग्णसेवेचे व्रत हाती घेत निस्वार्थ व समर्पित भावनेने रुग्णांसाठी कोव्हीड केअर सेंटर सुरु करत डॉक्टरांच्या मदतीने जवळपास 21 हजार रुग्णांवर उपचार करुन त्यांना सुखरुप घरी पोहोचवण्याचे काम केल्याबद्दल त्यांचेही यावेळी अभिनंदन केले.

आमदार कैलास गोरंट्याल, आमदार निलेश लंके, आर.आर. जोशी, प्रा. दिगांबर दाते यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी 100 शिक्षक क्लब ऑफ जालना यांच्यावतीने पालकमंत्री राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार निलेश लंके, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांचाही सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजाभाऊ मगर यांनी केले.

या कोरोना योद्धयांचा केला सन्मान

जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय जालना डॉ. अर्चना भोसले, प्रगतशील शेतकरी,जयकिसन ट्रेडिंग कंपनी, जालना नाथाभाऊ श्रीरंग घनघाव, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग, जिल्हा परिषद, जालना नागेश मापारी , पोलीस निरीक्षक, तालुका पोलीस स्टेशन, जालना देविदास शेळके, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, मंठा मच्छिंद्रनाथ देवव्रत धस, एम.बी.बी.एस., एम.डी.मेडिसिन, आस्था हॉस्पीटल जालना डॉ. आदिनाथ त्रिबंकराव पाटील, पोलीस उपनिरिक्षक, दामिनी महिला सुरक्षा पथक, जालना पल्लवी भाऊसाहेब जाधव, डी. एच. एम. एस.,श्रध्दा होमिओक्लिनिक, जालना डॉ. एस.के. मोरे, एम.बी.बी.एस., एम.एस. (ईएनटी) दिपक हॉस्पीटल, जालना डॉ. परमानंद आर. भक्त, नायब तहसिलदार, महसुल जिल्हाधिकारी कार्यालय, जालना श्रीमती स्नेहा शंकरराव कुहिरे, एम.बी.बी.एस. डी.जी.ओ. स्त्रीरोगतज्ञ, जालना हॉस्पीटल, जालना डॉ. अंजली प्रदिप हुसे, एम.बी.बी.एस. बालरोगतज्ञ संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल, जालना डॉ. श्याम पांडुरंग बागल, उपाध्यक्ष रोटरी क्ल्ब ऑफ, जालना, किशोर मधुकरराव देशपांडे, सहायक प्रशासन अधिकारी, जिल्हा परिषद जालना अनुतोष नाईक, एम.बी.बी.एस. एम.डी. जनरल मेडिसीन, दिपक हॉस्पीटल, जालना डॉ. सोमेश हरिदास नागरे, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय जालना डॉ. विजय परमसिंग राठोड, वैद्यकीय अधिकारी जिल्हा उपरुग्णालय अंबड डॉ. अमोल जाधव, वैद्यकीय अधिकारी सिव्हिल हॉस्पीटल जालना डॉ. गजानन संभाजीराव अवचार, तालुका वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य कार्यालय, भोकरदन डॉ. रघुविरसिंह मोहनसिंह चंदेल, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा उपरुग्णालय अंबड, डॉ. वाहेद मुसा शेख, वैद्यकीय अधिकारी, आर.बी.एस.के. सिव्हिल हॉस्पीटल जालना डॉ. पुनम राजेश अग्रवाल, वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय, बदनापूर डॉ. कृष्णा रामराव सरोदे, प्राध्यापक, पार्थ सैनिकी कनिष्ठ महाविद्यालय, जालना प्रा. दिगंबर मधुकरराव दाते, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जालना दिपक काजळकर, जिल्हा प्रतिनिधी, दैनिक दिव्य मराठी जालना बाबासाहेब डोंगरे,जिल्हा प्रतिनिधी, लोकशाही न्युज, जालना रवी जयस्वाल, मुख्याध्यापक, बालस्नेहालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरबाड ता. डहाणु जि. पालघर शाहु संभाजी भारती, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, जिल्हा परिषद जालना, प्रवीण कल्याणकर, सहशिक्षक तथा विषय सहायक, जिल्हा परिषद शाळा घाणखेडा ता. जाफ्राबाद, संतोष मधुकरराव मुसळे, बस वाहक, श्रीवर्धन आगार रायगड विभाग जिल्हा रायगड, मिट्टु त्रिंबक आंधळे, समन्वयक, महाराष्ट्र राज्य, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम फाऊंडेशन, मनिषा चौधरी, तलाठी जिल्हा नियंत्रण कक्ष जालना याह्या पठाण, कनिष्ठ सहायक, तालुका लसीकरण सहायक, जालना दिपक रानतराव वडगावकर, सहशिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जानेफळ पंडित ता. जाफ्राबाद श्रीमती सविता धनाजी बरडवाल, लिपिक, जिल्हाधिकारी कार्यालय ,जालना आर.डी. सातव, अभियंता, पाणी पुरवठा विभाग नगर परिषद जालना राजेश उध्दवराव बगळे, आशा वर्कर, उपकेंद्र अंबेगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र,डोणगाव ता. जाफ्राबाद श्रीमती सविता आसाराम देशमुख, प्रयोगशाळा अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र नुतन वसाहत नगर परिषद जालना बालाप्रसाद गोरख पवार, स्वच्छता निरीक्षक, नगर परिषद जालना, शोएब खान नवाब खान, आरोग्य सेविका,उपकेंद्र आंबेगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र डोणगाव ता. जाफ्राबाद वैशाली तेजराव लहाने, सहशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक उपकेंद्र प्राथमिक शाळा वरवंडी तांडा नं. 2 ता. पैठण, भरत धोंडिबा काळे, आरोग्य सेविका, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, सामान्य रुग्णालय जालना आश्विनी पांडुरंग लहाने, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्राथमिक आरोग्य केंद्र रामनगर जालना गोविंद कारभारी कणसे, शिपाई, विद्यालय सायगाव (डोंगरगाव) ता. बदनापुर अशोक रामराव मुगदल, बॅरो चिफ, एम.सी.एन. न्युज जालना साहिल पाटील, डेप्युटी ऑपरेटर, 33 के.व्ही. सब स्टेशन, केळीगव्हाण ता. बदनापुर सुशिल शालिग्राम दाभाडे, औषध निर्माण अधिकारी जिल्हा रुग्णालय जालना श्रीमती किर्ती विलासराव आसोलकर, सहशिक्षक, कै.नानासाहेब पाटील प्राथमिक विद्यालय, चंदनझिरा, जालना मिलिंद नारायणराव पंडागळे, आरोग्य सेविका, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, जिल्हा रुग्णालय जालना श्रीमती ममता नंदलाल ढाळे, अध्यक्ष, आधार बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, ता. परतुर एकनाथ वैजनाथराव राऊत, पत्रकार, संपादक व शिक्षक, प्रतिभा माध्यमिक विद्यालय काजळा ता. बदनापुर भगवान आसाराम धनगे, शिक्षक (पोलीस मित्र) ,रामचंद्र किनगावकर प्राथमिक विद्यालय जालना पवन प्रभाकरराव कुलकर्णी, तालुका कार्यक्रम सहाय्यक, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय जालना सुरेश शिवाजीराव भाबट, आरोग्य सेविका, उपकेंद्र वैद्यवडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र ढोकसाळ ता. मंठा बबीता हरिभाऊ केसकर, आरोग्य कर्मचारी, प्रतिनियुक्ती जिल्हाधिकारी कार्यालय, जालना महेंद्र वाघमारे, विद्यार्थी बाल वैज्ञानिक स्वप्निल अशोकराव मोरे, जिल्हा प्रतिनिधी, न्युज 18 लोकमत विजय कमळे पाटील, सहशिक्षक, जीवनराव पारे विद्यालय चंदनझिरा, जालना ओमप्रकाश भाऊसाहेब एखंडे, कनिष्ठ सहाय्यक, प्राथमिक आरोग्य केंद्र रांजणी ता. घनसावंगी मधुकर नारायणराव पंडागळे, कोविड नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय जालना मंगल दत्तात्रय मुळे, शिक्षक तथा पोलीस मित्र, रामचंद्र किनगांवकर प्राथमिक विद्यालय जालना प्रतिक विलास इंगळे, प्राध्यापक, जे.ई.एस. महाविद्यालय, जालना डॉ. राजेंद्र सोनवणे, तालुका आरोग्य पर्यवेक्षक, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, बदनापुर, सुदेश बळीराम वाठोरे, व्यवस्थापक, अन्नामृत फाऊंडेशन, जालना गणेश नखाते, श्रीमती शारदा गणपत तांबे, गणेश धुलीचंद्र चौधरी, संतोष ताराचंद सतपुरी, संजय विठ्ठलराव देठे, अरुण शिवाजी वानखेडे, झेङ पी. लाइव्ह, महाराष्ट्र,आशुतोष बन्सीधर नाईक, प्रविण प्रभाकरराव कल्याणकर, महेंद्र दिगंबरराव वाघमारे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *