ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जालना बंदला मोठा प्रतिसाद काँग्रेस पक्षाच्या मोटारसायकल रॅलीने लक्ष वेधले

December 8, 202014:51 PM 136 0 0

जालना (प्रतिनिधी)  केंद्रातील भाजप सरकारने केलेले शेतकर्‍याविरुद्ध काळे कायदे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी शेतकर्‍यांनी देशव्यापी आंदोलन उभारले आहे . केंद्रसरकारने कोणतीच दखल न घेतल्यामुळे मंगळवार रोजी सर्वपक्षीय भारत बंद पाळण्यात आला या अनुषंगाने जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जालना जिल्हा बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते . शेतकर्‍यांच्या,या मागणीला जनतेने प्रतिसाद देत बंद शांततेत पाळला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शेतकर्‍यांच्या देशव्यापी आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देत काँग्रेस पक्षाने या बंद मध्ये आपला सहभाग नोंदविला . जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते . जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठ मोंढा , कृषी उत्पन्न बाजार समिती , व्यापारी प्रतिष्ठान आदी बंदमध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले आहे आमदार कैलास गोरंट्याल यांनी शांततेत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते . या दरम्यान काँग्रेस पक्षाच्या वतीने हुतात्मा जनार्दन मामा चौकातून बंदच्या समर्थनार्थ मोटारसायकल रॅली काढण्यात आली प्रारंभी हुतात्म्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरवात करण्यात आली . सदरील रॅली मामा चौक येथून देऊळगाव राजा रोड ,सदर बाजार पोलीस स्टेशन , बडी सडक , राममंदिर , छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे होत कद्राबाद , गरीब शहा बाजार , मस्तगड , गांधीचमन ,शनिमंदिर , उड्डाण पुलावरून नूतन वसाहत येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे पोहचून डॉ आंबेडकर यांना अभिवादन करून रॅलीचे विसर्जन करण्यात आले . यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, जिल्हाकार्याध्यक्ष राजेंद्र राख , अ . भा .का सदस्य भीमराव डोंगरे , शहर काँग्रेस अध्यक्ष शेख मेहमूद, प्रदेश सचिव विजय कामड , प्रा सत्संग मुंढे , तालुका अध्यक्ष वसंत जाधव , विजय चौधरी, रान सावंत, बदर चाऊस, गुरुमित सिंग सेना, शेख शमशु, शेख रऊफ परसुवाले आनंद लोखंडे, नगरसेवक विनोद रत्नपारखे, शेख शकील, बाळकृष्ण कोताकोंडा , अरुण घडलींग, समाधान शेजूळ, चंद्रकांत रत्नपारखे, फकिरा वाघ , राजू पवार, शिवराज जाधव ,अब्दुल हमीद, अजीम बागवान, असलम कुरेशी ,रविकांत जगधने ,गणेश वाघमारे, रहीम तांबोळी , नारायण वाढेकर, जॉर्ज उगले, दावीद गायकवाड , ईरशाद कुरेशी , संतोष देवडे, अब्दुल रहमान ,शिवाजी गायकवाड , उत्तम वाघ , वसीम कादरी ,अंकुश गायकवाड आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते . रॅलीच्या समारोप प्रसंगी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख म्हणाले कि केंद्रातील भाजप सरकार शेतकर्‍यांच्या मागण्यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे . दिल्ली येथे सुरु असलेले शेतकर्‍यांच्या आंदोलनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असताना देशाच्या अन्न दात्याकडे लक्ष न देता अदाणी , अंबानी अश्या मोठ्या उद्योगपतींचे सरकारला भले करायचे आहे या सरकारला शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य नागरिकांच्या जीवनाशी काहीही देणं घेणं नाही हे सरकार मोठ्या भांडवल दारांचे पाठराखण करत असल्याची टीका श्री देशमुख यांनी केली. शेवटी शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख मेहमूद यांनी रॅली मध्ये उपस्थित काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शांततेत रॅली पार पाडल्या बद्दल त्यांचे मनापासून आभार मानले.या दरम्यान पोलिस निरीक्षक संजय देशमुख, प्रशांत महाजन, यशवंत जाधव यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *