तळीये गावातील घटना अंगावर शहारे येणारी आहे.२१ जुलैची रात्र तळीये गावांसाठी काळ बनली व संपूर्ण गावाला गिळंकृत केले.तळीये गावचा पहाड कोसळुन संपूर्ण घरे जमीनदोस्त झाले.त्याचप्रमाणे या पहाडाचा मलमा एक किलो मीटर पर्यंत पसरला.यावरून आपण अंदाज लावू शकतो की ही घटना कीती भयावह असावी.एकीकडे करोना महामारीने हजारो घरे उजाडली आणि अचानक २१ जुलैला महाराष्ट्रावर निसर्गाचा पहाड कोसळुन हाहाःकार निर्माण झाला.महाराष्ट्रावर एका संकटामागुन एक संकट सुरूच आहेत. करोना महामारीची दुसरी लाट हजारो लोकांसाठी काळ बनली व हसते-खेळते परिवार या जगातुन निघून गेले.करोना महामारी थोडी संथ होत नाही तर वरूनदेवतेने विक्राळ रूप धारण केले आणि मोठ्या प्रमाणात जिवीत हानी झाली.मराठवाडा, कोकण, रायगड, चिपळूण, सातारा,लोनावळा, कोल्हापूर,वर्धा, बदलापूर,महाड, मुंबई,विदर्भ इत्यादी सह संपूर्ण महाराष्ट्र जलमग्न झाले असून महाभयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.रायगडमधील तळीये गावात दरड कोसळुन ४९ जनांचा मृत्यू , रत्नागिरीत १७ मृत्यू, पोलादपूरच्या केवनाळे सुतारवाडीत ११ मृत्यू, साताऱ्यातल १८ जनांचा मृत्यू सतत पावसामुळे व ढगफुटीने दरड कोसळुन मोठ्या प्रमाणात जिवीत हानी झाली व अजुनही शेकडो नागरिक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येते.यामुळे अनेक भागात अश्रृचा महापुर आल्याचे दिसून येते व लोकांचे अश्रृ थांबता-थांबत नाही कारण ही अंगावर काटे येणारी घटना आहे.याव्यतीरीक्त राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसामुळे छोट्या-मोठ्या व भयावह घटना घडल्याचे दिसून येते.जनुकाय महाराष्ट्रावर निसर्ग कोपला की काय असे वाटत आहे.मृत्यृचे थैमान पहाता अंगावर शहारे येतात.
अशा कठीण परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारांनी युध्दपातळीवर मदत करून अशा घटना कशा टाळता येईल याचा अभ्यास करने गरजेचे आहे.कारण वाढत्या औद्योगिकीकरणामुळे, प्रदुषणाचे व ग्लोबल वॉर्मिगमुळे भारतासह संपूर्ण जगाचे संतुलन डगमगतांना दिसत आहे.सध्याच्या परिस्थितीत अनेक युरोपीय देश निसर्गाच्या महाप्रलयाचा सामना करीत आहे.यात मुख्यत्वेकरुन अमेरिकेसह अनेक देश महाप्रलयाशी संघर्ष करावा लागत आहे.चीनमध्ये सुध्दा पावसाने उग्ररूप धारण केले आहे.चीनमध्ये इतका पाऊस झाला आहे की एक धरण त्यांना फोडावे लागले.यामुळे लाखोंच्या संख्येने लोक संकटात आहेत.देशात किंवा जगात अती वृष्टी,अती थंडी,अती उष्णता यांचे मुख्य कारण म्हणजे जंगल तोड.आज रशियातील हजारो एकरमध्ये पसरलेल्या जंगलामध्ये आग लागली आहे.ही आग इतकी भयानक आहे की अजून पर्यंत आटोक्यात आलेली नाही.याच प्रकारे कॅलीफोर्नियातील जंगल धु-धु जळत आहे.अशापध्दतीने भारतासह संपूर्ण जगात वनवा, ढगफुटी, महाप्रलय, सुनामी,भुकंप ह्या संपूर्ण नैसर्गिक आपदा मानवाने तयार केलेल्या आहेत.यावर अंकुश लावायचा असेल तर वृक्षलागवड मोठ्या प्रमाणात होने गरजेचे आहे.आपणच निसर्गाचा ह्रास करून महाप्रलयाला खुले आमंत्रण दिल्याचे दिसून येते.आजही मेळघाटातील ब्रिटिशकालीन ११८ पुलांपैकी २० पूल अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याचे सांगण्यात येते.ह्या घटनांवर सरकारने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे अन्यथा अनर्थ होऊ शकतो याला नाकारता येत नाही.कारण ज्या दुर्घटना आपण टाळू शकतो त्याला सर्वप्रथम प्राधान्य द्यायला हवे.अन्यथा निसर्ग आपल्याला सोडणार नाही.विदर्भाला सुध्दा पावसाने सोडले नाही.त्यामुळे अती पावसाचा धोका कमी व्हावा यासाठी गोसेखुर्द प्रकल्पाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले आहे.विदर्भात अतिपावसामुळे ४ लोकांचा मृत्यू झाला तर १९ तालूके अती पावसाने बाधीत आहे.अनेक नद्यांची मोठ्या प्रमाणात पातळी वाढल्याने लोकांमध्ये दहशतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.संपुर्ण धरण भरल्यामुळे आणखी धोके वाढले आहे.ऐकीकडे निसर्ग सर्वसामान्यांना मृत्यूच्या खायीत लोटत आहे तर दुसरीकडे अन्नदाता शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक पाण्याखाली गेल्याने त्यांची चिंता वाढली आहे.महाराष्ट्रात आतापर्यंत अती पावसामुळे १३६ लोकांचा मृत्यू झाला व शेकडो बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.राज्यातील १४ जिल्ह्यांना अती पावसाचा धोका असल्याने ७२ तासांसाठी हाय अलर्टवर आहे.
त्यामुळे पावसाचा धोका अजून पर्यंत टळलेला नाही.त्यामुळे लोकांनी सुध्दा सावध रहाने गरजेचे आहे.म्हणजे महाराष्ट्रावरील अती पावसाचा धोका जैसेथे असल्याचे दिसून येते.अती पावसामुळे भुस्खनन किंवा पहाड कोसळण्या मागचे मुख्य कारण म्हणजे “पहाडावरील जंगल कटाई”. सध्या अती पावसामुळे उद्भवलेली भयावह स्थीती पहाता पहाडावरील वृक्षारोपण युध्दपातळीवर होने गरजेचे आहे.देशात किंवा राज्यात वृक्षारोपण फक्त कागदावर जास्त व जमीनीवर कमी दिसून येते त्यामुळेच अशा घटना उद्भवतात.त्यामुळे ही राज्याची व भारताची शोकांतिकाच म्हणावी लागेल.त्यामुळेच नैसर्गिक आपदा ओढावून येते व अशा घटना मोठ्या प्रमाणात होतांना दिसते.ही बाब देशाची १३५ कोटी जनता चांगल्याप्रकारे जानते. कारण राजकीय पुढारी भ्रष्टाचार करण्यात तल्लीन असतात.राजकीय पुढाऱ्यांनो याद राखा लोकांच्या अश्रृची कदर करून त्यांना दिलासा द्या व निसर्गावर अत्याचार होणार नाही याची काळजी जातीने घेउन पुढचे पाऊल ताबडतोब उचलने गरजेचे आहे.अन्यथा येणाऱ्या विनाशाला रोखने कठीण होईल.राजकीय पुढाऱ्यांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की कठीण घडीला राजकारण न करता व एकामेकांवर टिकाटिपणी न करता संपूर्ण पक्ष-विपक्ष मदतीसाठी एकत्र येऊन या दु:खद घटनेवर फुंकर घालून खुल्या हाताने मदत केली पाहिजे.मृतांच्या प्रती मी दु:ख प्रगट करून श्रद्धांजली वाहतो व ईश्वर त्यांच्या परिवाराला शक्ती प्रदान करेल अशी ईश्र्वचरणी प्रार्थणा करतो.हे देवा या संकटापासून सावरण्याची सर्वांना शक्ती प्रदान कर.असे दु:खाचे सावट कोणावरही येवू नये अशी देवाला प्रार्थना करतो.
लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर).
मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.
Leave a Reply