जालना/ प्रतिनिधी:- जालना जिल्हयात व शहरात जनावर चोरी च्या वाढत्या गुन्हयांच्या अनुषगाने मा.पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी जनावर चोरी गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी व उघडकीस आणणे बाबत स्थानिक गुन्हे शाखा, जालना यांना सुचना देऊन आदेशीत केले होते. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक जनावर चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थापन करण्यात आले होते.मारगील काही दिवसापासुन सदर पथक हे वरीष्ठांच्या मार्गदरशनाखाली जनावर चोरी करणारे गुन्हेगाराची माहिती घेत होते.
आज दि. 06 रोजी सकाळी पाच वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांना माहिती मिळाली की, नवीन मोंढा परिसरातुन काही इसम स्कॉर्पिओ गाडीमध्ये जनावर चोरी करुन सुसाट वेगाने आडव्या येणारे लोकांच्या अंगावर गाडी टाकुन पळुन गेले आहेत अशी माहिती जागरुक नागरिकांनी दिली. त्यावरुन पथकातील अधिकारी व अंमलदार सॅम्युयल कांबळे,कृष्णा तंगे, सचिन चौधरी यांना माहिती मिळाली की, सदरची पांढ-या रंगाची स्कॉर्पिओ गाडी ही जालना- औरंगाबाद रोडने गेलेली आहे. त्यावरुन अधिकारी व अंमलदार यांनी सतत माहिती घेत सदर गाडीचा पाठलाग चालु ठेवला. औरंगाबाद शहरात गेल्यानंतर स्कॉर्पिओ गाडी ही औरंगाबाद शहरात अमरप्रित हॉटेल- कारडा कॉर्नर – उस्मानपुरा स्मशानभुमी रोड या मार्गाने जागृत हनुमान मंदिर प्रतापनगर येथील मोकळया जागेत जाऊन स्कॉर्पिओ कार थांबविली. गाडीमधील इसम स्कॉर्पिओ वाहन सोडुन पळुन जात असतांना पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्याचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले. त्यास विचारपुस करता शेख समीर शेख शाकीर उर्फ कुरेशी वय 46 वर्षे रा. सम्सनगर शाहनुरवाडी औरंगाबाद असे त्याने त्याचे नाव सांगुन त्याचे इतर साथीदारासह स्कॉर्पिओ गाडीत जनावर चोरी करीत असल्याचे सांगितले. तो जनावर टोळीचा मुख्य म्होरक्या शेख समीर शेख शाकीर उर्फ कुरेशी वय 46 वर्षे रा.सम्सनगर शाहनुरवाडी औरंगाबाद हा असुन त्याचे इतर साथीदार निष्पन्न करणे चालु आहे. सदर पांढ-या रंगाची स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम एच 06 ए झेड 8161 ची पाहणी करता गाडीच्या काचेवर काळया रंगाची फिल्म लावलेली व मागच्या बाजुचे बसण्याचे शिट काढुन ठेवलेले किंमत 3,लाख रुपये ज्यात दोन काळया पाढ-या गाई व एक काळया पांढ-या रंगाचे वासरु किंमती 60 हजार रुपयाचे असा एकूण 3 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला असून त्याबाबत फिर्यादी योगेश भगत रा.जालना यांच्या फिर्यदवरुन पोलीस ठाणे चंदनझिरा जालना येथे गुन्हा दाखल आहे. आरोपी शेख समीर शेख शाकीर उर्फ कुरेशी वय 46 वर्षे रा.सम्सनगर शाहनुरवाडी औरंगाबाद हा ब-याच दिवसापासुन जालना जिल्हयातील व शहरातील जनावर चोरी करत असून त्याचेकडून बरेच जनावर चोरीचे गुन्हे उघकीस येण्याची शक्यता आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुभाष भुजंग, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, शिवाजी नागवे,सपोनि,पोहेको भाऊराव गायके, सॅम्युअल कांबळे, पोना कृष्णा तंगे,सचिन चौधरी,देवीदास भोजणे. किशोर पुंगळे यांनी केलेली आहे.
Leave a Reply