ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

लायन्स क्लब आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग आणि आदिवासी बांधवांना कोवीडलसीकरण संपन्न

October 9, 202114:07 PM 3 0 0

अश्विनी निलेश धोत्रे.
लायन्स क्लब नवी मुंबई चॅम्पियन्स क्लब आणि आरोग्य विभाग तालुका उरण यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा 3231A2 चे मेडिकल ऐड विभागाचे जिल्हा चेअर पर्सन लायन संदीप म्हात्रे यांच्या संकल्पनेतून, उरण तालुक्यातील दिव्यांग आणि आदिवासी बांधवांना कोवीड लस देण्यात आली. त्या उपक्रमास आदिवासी बांधवांनी न घाबरता भर भरून प्रतिसाद दिला.


आज दिनांक 06/10/2021 बुधवार रोजी उरण तालुका आरोग्य विभागा तर्फे अपंग आणि आदिवासी बांधवांना को विड लस देण्यात आली. त्या लसीकरणमोहीमेस दीव्यांग आणि आदिवासी बांधवांनी भर भरून प्रतिसाद दिला. मा. आमदार मनोहर शेठ भोईर यांनी स्वतः आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना सूचना करून दिव्यांग आणि आदिवासी बांधवांना लसीकरण मोहीम राबविण्यात आली पाहिजे असे सांगितले. उरण तालुका आरोग्य अधिकारी डॉ इट करे सर आणि वैद्यकीय अधिकारी डॉ भोसले सर यांनी त्वरित त्या सूचनेला प्रतिसाद देवून आज लसीकरण मोहीम राबविली. सदर लसीकरण मोहिमेत एकूण 125 दिव्यांग, आदिवासी आणि गोर गरीब जनतेने लसीकरणाचा लाभ घेतला. सदर कार्यक्रमास मा. आमदार मनोहर शेठ भोईर साहेब, डॉ भोसले सर, लायन्स क्लब नवी मुंबई चॅम्पियन्स प्रेसिडेंट लायन सुनील मिश्रा , श्री रुपेश पाटील, , श्री अमित घरत,अपंग मित्र संदीप म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार सर , प्रा राजेंद्र मढवी सर उपस्थित होते. आरोग्य विभागातर्फे आरोग्य सेवक देसले सर, कोळी सर, केणी सिस्टर आणि आशा वर्कर उपस्थित होत्या.सर्वात महत्त्वाचे म्हणजे आज योगा योगाने सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार सर यांचा वाढ दिवस असल्याने सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *