ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शेतकर्‍यांच्या नुकसानीची आ. कैलास गोरंट्याल यांनी केली पाहणी शासनाकडे पाठपुरावा करून भरपाई मिळवून देण्याची ग्वाही

September 11, 202113:31 PM 21 0 0

जालना (प्रतिनिधी) : अतिवृष्टीमुळेे शेतकर्‍यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीची आमदार कैलास गोरंट्याल यांनी नुकतीच पाहणी केली असून या वेळी त्यांनी विविध गावातील शेतकर्‍यांच्या प्रत्यक्ष भेटी घेवून त्यांच्याशी संवाद साधत झालेल्या नुकसानीची माहीती घेवून सदर भरपाई मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.


जालना जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक गोर गरीबांच्या घरांची पडझड होवून जनावरे देखील मृत्यूमुखी पडली आहेत. काल गुरूवारी आ. कैलास गोरंट्याल यांनी जालना विधानसभा मतदार संघातील बठाण बु., गोलापांगरी, कुंभेफळ, अंतरवाला आदि गावांना भेटी देवून थेट शेतात जावून शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी आ. गोरंट्याल यांच्या जवळ झालेल्या नुकसानीच्या व्यथा मांडतांना अनेक शेतकर्‍यांना गहीवरून आले होते. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाकडून भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी उपस्थित शेतकर्‍यांमधून करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांच्याशी आपली विस्तृत चर्चा झाल्याचे सांगून झालेल्या नुकसानीचे तलाठी व मंडळअधिकार्‍या मार्फत तातडीने पंचनामे करण्याच्या सुचना त्यांनी दिल्याचे सांगून भरपाई मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर देखील पाठपुरावा करण्याची ग्वाही आ. कैलास गोरंट्याल यांनी शेतकर्‍यांना दिली.
कुंभेफळ येथील दौर्‍यात बालासाहेब सिरसाठ, बाबासाहेब म्हस्के, रामेश्‍वर जर्‍हाड, शेख शाकीर, बेलाअप्पा काटकर, काशिनाथ वाहुळ, गजानन गवारे, शिलाबाई वाहुळे, भानुदास फरांडे, रामकिसन सिरसाठ, गणेश औरंगे, अंतरवाला येथील दौर्‍यात कृष्णा पडुळ, मनोहर सुळसुळे, राजीव भोईटे, अनिल ससाणे, बबन भोईटे, सचिन लोखंडे, बाळु लोखंडे, रमेश ढोकळे, सुरज पडुळ, अन्सीराम भोईटे, संताजी भोईटे, संतोष गायकवाड, मिठाराम सुळसुळे, जनाबा चाटे, बठाण बु. येथील दौर्‍यात बबन विर, भाऊसाहेब हाडके, शिवाजी देवडे, संतोष देवडे, विठ्ठलराव बागल, नारायण पाटेकर, जीवन बागल, रामनाथ देवडे, विनोद बागल, सचिन बागल, संजय बागल, पिराजी उमप, संदिप देवडे, कृष्णा देवडे, राजीव बागल, सुरेश देवडे यांच्यासह शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *