ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

महाविकास आघाडी सरकार ओबीसींना फसवत आहे

September 21, 202113:37 PM 22 0 0

जालना प्रतिनिधी :- 5 ऑक्टोबर रोजी 5 जिल्हयातील पोट निवडणुका होत आहेत सुप्रीम कोर्टाने या पाच जिल्हयातील ओबीसी च्या कोटयातील जागा रद्द केल्यामुळे 5 जिल्हयात ओबीसींच्या रिक्त जागांवर खुल्या प्रवर्गातील उमदेवारांनी नामनिर्देशन पत्रे भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यामुळे या जिल्हयात ओबीसींचे आरक्षण रद्द झाले आहे. असे असतांना महाराष्ट्र सरकारने काल जो अध्यादेश काढाला आहे तो म्हणजे ओबीसींच्या दिशाभुल करण्याचे षडयंत आहे. कारण या अध्यादेशामुळे या 5 जिल्हयात ओबीसींसाठी राजकीय आरक्षण मिळण्याची शक्यताच नाही.

जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या पुढील काळात होणऱ्या निवडणुकांसाठी सुप्रीम कोर्टाने एम्पीरिकल डेटाची अट घातलेली आहे. सरकारने डेटा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन पुरे करण्यासाठी त्यांच्याकडे क्वाटीफाएबल एम्पीरिकल डाटा नाही असा डाटा देण्याचा त्यांचा इरादाही नाही आणि ते उपलब्ध्‍ा करुन देतील तो डाटा कोर्टात चॅलेन्ज होण्याची शक्याता आहे. असे महाविकास आघाडी सरकार ने जाहिर केले.

अस अध्यादेश काढणे हे ओबीसी ची मते मिळविण्यासाठी चाललेले नाटक आहे. गरीब मराठा आरक्षणाची जशी सेना, राष्ट्रवादी, कॉग्रेस व भाजपा या पक्षांनी वाट लावली त्याप्रमाणे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची वाट लावण्याचे राजकारण सेना, राष्ट्रवादी, कॉग्रेस व भाजपा खेळत आहेत. या फसवणुकीच्या षटयंत्रा पासुन ओबीसींनी सावध रहावे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *