जालना प्रतिनिधी:- लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरुन महेश अशोक शिळवणे (वय 45 वर्षे रा. नर्सिग कॉटर, घाटी दवाखाना समर्थनगर जुना जालना) हा हातात धारदार कोयता घेवुन नर्सिग कार्टर घाटी रुग्णालय जुना जालना परीसरात दहशत निर्माण करीत आहे अशा खात्रीलायक माहीतीवरुन पोकॉ मनोज हिवाळे, पोकॉ संतोष अंभोरे,पोकॉ रामलाल कांगणे यांनी मा.पोनि.सो. यांना माहीती देवुन तात्काळ दखल घेत घटनेच्या ठिकाणी पोहोचुन हातात धारदार कोयता घेवुन फिरणाऱ्यां इसमास मोठया शिताफिने व प्रसंगावधान साधुन ताब्यात घेतले.
सदरील इसमाकडुन एक धारदार कोयता जप्त करण्यात आला आहे.सदर इसमावर पोलीस ठाणे कदीम जालना येथे भारतीय हत्यार कायदा भांदवी प्रमाकायदयान्वये कार्यवाही करण्यात आली आहे. सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक श्री.विनायक देशमुख,मा. श्री.अपर पोलीस अधिक्षक श्री. विक्रांत देशमुख,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे प्रभारी अधिकारी पो.नि.श्री बागुल साहेब, पोना.मनोज हिवाळे, पोना.संतोष अंभोरे, पोकॉ रामलाल कांगणे ई.च्या वतीने करण्यात आली आहे.
Leave a Reply