ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

१९ रोजी बाबासाहेब पाहिलेला माणूस या कार्यक्रमाचे आयोजन

December 17, 202113:02 PM 55 0 0

नांदेड – तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात १९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. ‘बाबासाहेब पाहिलेला माणूस’ या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मार्गशीर्ष पौर्णिमेनिमित्त पौर्णिमोत्सव या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक धम्मगुरू भदंत पंय्याबोधी थेरो यांनी दिली.

ऋषीपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात महिन्याच्या दर पौर्णिमेला दस दिवशीय श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येते. ३६५ दिवस चालणाऱ्या व २४ तास श्रामणेर दिक्षेकरिता सुरू राहणाऱ्या या केंद्रात जिल्हा, जिल्हा परिसर आणि महाराष्ट्रासह विविध राज्यांतून उपासक दीक्षा घेण्यासाठी येत असतात. शिबिरानंतर पौर्णिमोत्सव या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात येते. १९ डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात बाबासाहेब पाहिलेला माणूस या विषयावर मान्यवर बोलणार आहेत. यावेळी माजी उपप्राचार्य साहेबराव इंगोले, एस. एच. हिंगोले, अॅड. भानुदास मगरे, यशवंतराव उबारे, प्रा. विनायक लोणे, गोणार येथील पहिल्या जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, धम्मसेवक गंगाधर ढवळे, निवृत्ती लोणे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सकाळी अकरा वाजेपासून सुरू होणाऱ्या कार्यक्रमात धम्मध्वजारोहण, परित्राणपाठ, त्रिरत्न वंदना, गाथापठण, भोजनदान, आर्थिक दान, औषधी तथा विविध वस्तूंचे दान, धम्मदेसना, बुद्ध भीम गितांच्या गायनाचे कार्यक्रम, महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कविसंमेलनाचेही आयोजन करण्यात आले आहे. भदंत पंय्याबोधी थेरो यांच्यासह भंते संघरत्न, भंते चंद्रमणी, भंते धम्मकिर्ती, भंते सुदर्शन, भंते श्रद्धानंद, भंते शाक्यपुत्र, भंते संघमित्र, भंते सुनंद, भंतेज्ञसुदत्त, भंते सुयश, भंते शिलभद्र, भंते सुगत, भंते संघानंद, भंते संघदीप आणि नवदीक्षित श्रामणेर भिक्खू संघ यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *