ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

राष्ट्रवादी काँग्रेस तर्फ मंगळागौर स्पर्धा उत्साहात संपन्न

August 11, 202213:55 PM 13 0 0

मुरूड  जंजिरा(सौ नैनिता  कर्णिक ) : मुरूड जंजिरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फ  माळी समाज हाॅल मध्ये मंगळागौर  स्पर्धा आयोजित करण्यात आली यावेळी  मान्यवर माजी पालक मंत्री आदिती तटकरे,तालुका अध्यक्ष मंगेशभाई दांडेकर,मुग्धा दांडेकर मुरूड तालुका अध्यक्षा अध अॅ मृणाल खोत,शहर अध्यक्षा प्रमिला माळी, याच बरोबर जुईली गुंजाळ स्मीता खेडेकर,विश्वा वर्तक,विद्या मसाल विजय पैर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.स्पर्धा अतिशय  रंगतदारझाल्या मंगळागौर  स्पर्धाचे परीक्षण स्नेहा आंब्रे यांनी अतिशय उत्तमरीत्या केले.

स्पर्धेत  प्रथम क्रमांक नामदेव  शिंपी समाज महिला मंडळ यानी पटकावला रोख रक्कम ७०००व आकर्षक सन्मानपत्र माजी पालकमंत्री आदिती तटकरे,मंगेशभाई दांडेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.खेळ बसविण्यात साठी शिवानी नाझरे.रोशनी सदरे यांनी मोलाचे सहकार्य केले.गीताचे सादरीकरण प्रतिभा बागडे  यांनी केले.

द्वितीय क्रमांक सखी महिला मंडळ ५००० रूपये रोख व  सन्मानपत्र तृतीय  क्रमांक गणेश आळी महिला मंडळ ३०००रूपये रोख व सन्मानपत्र  तसेच  उत्तेजनार्थ  अंबा महिला मंडळनांदगाव ,गावदेवी महिला मंडळ मुरूड

यांना देण्यात  आले.बक्षिस वितरण समारंभ मान्यवरांकडून करण्यात आला. सर्व  उपस्थित मान्यवर,स्पर्धक महिला प्रेक्षक,पत्रकार छायाचित्रकार कार्यक्रमाचे आयोजक संयोजक  तसेच सहकार्य करणाऱ्यांचे आभार मुरूड तालुका अध्यक्षाअॅड मृणाल खोत यानी मानून  कार्यक्रमाची सांगता केली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *