ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

बाजारपेठ फुलली प्लास्टिकच्या फुलांनी

September 6, 202115:23 PM 48 0 0

उरण ( संगिता पवार ) – लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे बाप्पांच्या स्वागतासाठी उरण बाजार पेठ प्लॅस्टीकच्या फुलांनी सजल्या आहेत. गणपतीच्या हटके मखराचे पर्याय शोधणाऱ्या गणेश भक्तांचे लक्ष या फुलांकडे आकर्षित होत आहे. तर दुसरीकडे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने सजावट करताना इकोफ्रेंडली मखराला प्राधान्य द्यायला हवे. तसेच सण झाल्यावर त्याचे पावित्र्यही जपणे गरजेचे असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.


दर वर्षी गणरायाच्या अगमनापूर्वी बाजारपेठ मखराच्या विविध साहित्यांनी वहरून जाते. गणरायासाठी आरास करण्यासाठी या फुलांचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत असल्याने ही प्लॅस्टिकची फुले विक्रीस ठेवली आहेत. यामुळे बाजारपेठ रंगीबेरंगी फुलांनी बहरून गेल्याचा भास होतो आहे. या फुलांची अनेकांना भुरळ पडतच असते. गणेश भक्त थांबून ही फुले खरेदी करीत असल्याचे करीत दृष्य सध्या या ठिकाणी पहावयास मिळत आहे.
साजावातीच्या वस्तू फुलांच्या माळा ५० ते १५० रुपये , पडदे १५० ते ५०० पर्यंत ,कंठी , , तोरण ,कुत्रिम फुलांच्या माळा फुलदाण्या ,रंगीबेरंगी पडदे
आदी बाजार पेठेत विकावयास आल्या आहेत .
यंदा कोरोना पादुर्भावा मुळे सजावटीचे साहित्यविकणाऱ्या व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे . बाजार पेठा सजल्या असल्या तरीही म्हणावा तसा प्रतिसाद नसल्याचे दिसत आहे असे उरण बाजार पेठेतील कुणाल हार्डवेअर अॅण्ड जनरल स्टोअर्स चे खेलन अनिल शाह यांनी सांगितले .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *