ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आईनेच केली लहान मुलाची हत्या

January 12, 202114:27 PM 23 0 0

आईनेच आपल्या मोठ्या मुलासोबत मिळून लहान मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ जानेवारीला मुलाचा मोठा भाऊ शिवाजी आंगळे आणि त्याच्या आईने धारदार शस्त्राने हत्या करण्याचा कट रचला. ठाण्यातील चिराग नगरमध्ये हे कुटुंब वास्तव्यास होतं. हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांनी मृतदेह एका प्लास्टिक बॅगमध्ये भरला आणि वाहनाने कसारा घाटात पोहोचून टाकून दिला. महिलेने पोलिसांना आपल्याला ९ जानेवारीला मुलाचा मृतदेह कसारा घाटात सापडल्याचा फोन आल्याची खोटी माहिती दिली. मुलाच्याच मोबाइलवरुन आलेल्या फोनवर सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आणि कपडे सापडल्याची माहिती देण्यात आल्याचा दावा महिलेने पोलिसांकडे केला. यानंतर आपण आपल्या मोठ्या मुलासोबत तात्काळ घटनास्थळी पोहोचली असंही महिलेने सांगितलं.

तपासादरम्यान पोलिसांना महिला आणि तिच्या मुलावर संशय आला. चौकशीदरम्यान दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला. आरोपींनी पोलिसांना सांगितलं की, “तो काही काम करत नव्हता. सतत पैसे मागायचा आणि नाही दिलं तर मारहाण करण्याची धमकी द्यायचा”. पोलिसांना आई आणि मुलाला अटक केली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *