ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्ह्यात 298 प्रकरणे निकाली

December 12, 202112:35 PM 55 0 0

जालना दि. 11  :- महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्राधिकरण, मुंबई व राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरण, दिल्ली यांच्या निर्देशानुसार दि. 11 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रीय लोक अदालत जिल्हा न्यायालय जालना, तसेच जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात एकाच वेळेत संपन्न झाली. राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन जिल्हा न्यायालयात अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन झाली. त्यानंतर “एक मुठ्ठी आसमान” या गीताची चित्रफीत पक्षकार बंधुना दाखवून राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये समोपचाराने वाद मिटविण्याबाबत आव्हान करण्यात आले.

लोकन्यायालयात वैवाहिक वाद, मोटार वाहन अपघात, दिवाणी व फौजदारी 138 एन. आय. ॲक्ट भुसंपादनाची प्रकरणे, कामगार संबंधिचे वादाचे प्रकरणे, विद्युत प्रकरणे, पाणी बिल ,महसुलची प्रकरणे व दावा दाखल पुर्व प्रकरणे या राष्ट्रीय अदालतीमध्ये आपसी सामंजस्याने तडजोड करण्यासाठी ठेवण्यात आले होते. जिल्हा विधीसेवा प्राधिकरण यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक तालुका विधीसेवा समिती करीता एका जिल्हा न्यायाधीशाची नेमणुक करुन वेळोवेळी आढावा घेण्यात आला तसेच लोकन्यायालयाच्या दिवशी समोपचाराकरीता विशेष न्यायाधीशांची नेमणुक करुन पक्षकारांना लोकन्यायालयात खटला समोपचाराने मिटविण्याकरीता समुपदेशन करण्यात आले.
जिल्ह्यामधील कौटुंबिक, वैवाहिक छोट्या वादातुन 15 कुटुंबाचे प्रकरणे सामंजस्याने निकाली काढले. त्यातील एका प्रकरणात वरिष्ठ नागरिकाने गेल्या सात वर्षापासुन प्रलंबित असणारा कौटुंबिक वाद आपसी सामंजस्याने मिटवला. जालना व परतुर तालुक्यात कलम 138 एन.आय. ॲक्ट नुसार असलेली पाच वर्ष जुनी प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आले. जालना जिल्ह्यात या लोकअदालतीमध्ये एकुण 298 प्रकरणे आपसी सामंजस्याने निकाली काढण्यात आले. प्रलंबित 181 खटल्याच्या तडजोडीत एकुण रक्क्म रुपये 1 कोटी 55 लाख 40 हजार 91 व दावा दाखल पुर्व 75 खटल्याच्या तडजोडीतुन एकुण रक्कम रुपये 1 कोटी 3 लाख 59 हजार 837 प्रमाणे तडजोड करण्यात आली.
या ऐतिहासिक उपक्रमास सर्व पक्षकार, विधीज्ञ, शासनाचे प्रतिनिधी, बँक पतसंस्थेचे प्रतिनिधी यांनी उत्सफुर्त प्रतिसादी दिला.
ही लोकअदालत कोवीड प्रतिबंधक सर्व नियमावलीचे पालन करुन पार पाडण्यात आली अशी माहिती सचिव जिल्हा विधीसेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *