उरण (संगिता पवार) उरण शहर सह तालुक्यात कोरोनावर मात करत भक्तिपूर्ण वातावरणात भक्तांच्या घरोघरी मोठ्या उत्साहात घट स्थापना करण्यात आली असून सार्वजनिक नवरात्री मंडळात सुद्धा नवरात्री उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरवात झाली आहे. नवरात्रात देवीच्या नऊ वेगवेगळ्या रुपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या नऊ दिवसांत सकाळ – संध्याकाळच्यावेळी दुर्गा मातेची पूजा आणि आरती केली जाते. काही भाविक नऊ दिवसांचा कडक उपवास ठेवतात.महिलावर्ग घरच्या घरी देवीची पूजा करीत असताना दिसत आहेत .
उरण शहरातील मोरा येथील फड न. ७ जवळील डोंगरावर असलेली सुमारे २०० वर्षा पूर्वीची एक वीरा देवीचेमंदिर आहे ,उरण शहरातील देऊळ वाडी येथील उरणावती देऊळ ,करंजा येथील द्रोणागिरी देवी मंदिर ,वेश्वी गाव जवळील डोंगरावर असलेली एक वीरा देवी मंदिर ,चिरनेर जवळील डोंगरावरील कळंबूसरे डोंगरावरील एक वीरा देवी मंदिर ,जसखार गावातील रत्नेश्वरी माता देवीचे मंदिर आदी ठिकाणी दर्शनासाठी महिला वर्ग देवीची यथासांग पूजा करतांना दिसत आहेत .
शहरातील विविध देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवाची पूर्ण झाली असून मंदिराला रंगरंगोटी करण्यात आली आहे. उरण शहरातील देऊळ वाडी येथील उरणावती देवीच्या नावा वरून उरण शहराला नाव पडले असे येथील नागरिक सांगतात.
Leave a Reply