उरण(संगिता पवार) 08, ऑक्टोबर, 2021: भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत देशातील अग्रणी कंटेनर बंदर असलेल्या जेएनपीटीमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत त्याच बरोबर विविध स्पर्धांचे आयोजन ही करण्यात आले आहे. राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात देशातील नागरिकांना सामील करण्याच्या उद्देशाने भारत सरकार द्वारा ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ हे राष्ट्रव्यापी अभियान राबविण्यात येत आहे. जेएनपीटी हे देशातील आघाडीचे कंटेनर बंदर असून बंदर परिसरातील गावांना सर्व प्रकारच्या सुविधा प्रदान करुन जेएनपीटीने नेहमीच आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. याचाच एक भाग म्हणून जेएनपीटीने ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत रायगड जिल्ह्यातील चार अनाथाश्रम/वृद्धाश्रमांना विविध प्रकारची मदत केली आहे. अनाथाश्रम/वृद्धाश्रमातील लोकांसाठी जेएनपीटीने सिमेंट काँक्रीटचे बेंच, सिटिंग मॅट, पिण्याच्या पाण्याचे वॉटर कूलर आणि इन्व्हर्टरसारख्या विविध गरजेच्या वस्तुंची मदत केली आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ विषयी बोलताना जेएनपीटीचे अध्यक्ष श्री संजय सेठी, भा.प्र.से. म्हणाले स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ हा भारताच्या सामाजिक-सांस्कृतिक आणि आर्थिक नीतिमूल्यांचा जागर करुन साजरा करण्याचा एक देशव्यापी प्रयत्न आहे. याच अनुषंगाने आम्ही विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून बदलत्या भारताचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न करीत आहोत. “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ मध्ये जेएनपीटी सक्रियपणे योगदान देत असून आगामी महिन्यांतही अनेक उपक्रमांचे आम्ही नियोजनही केले आहे. हे राष्ट्रव्यापी अभियान यशस्वी करण्यासाठी आम्ही आमचे कर्मचारी व भागधारकांसह सक्रिय योगदान देत राहू.
‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत जेएनपीटीने अनेक उपक्रम राबविले आहेत. त्याचप्रमाणे देशाची महान संस्कृती आणि गौरवशाली इतिहास यावर प्रकाश टाकणाऱ्या विषयांवर आधारित निबंध लेखन, गायन आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केल्या गेल्या. तसेच, जेएनपीटीचे अधिकारी व कर्मचा-यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या प्रगतीचे स्मरण करण्यासाठी 75 ची मानवी आकृति तयार करुन राष्ट्रगीत गायले. याचाच एक भाग म्हणून एक योग सत्रही आयोजित केले गेले. यासोबतच ‘स्वच्छ भारत अभियाना’चा प्रचार-प्रसार करुन त्यास चालना देण्यासाठी बंदर परिसरात स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणारे फलक आणि बॅनर लावण्यात आले आहेत. जेएनपीटीचे कर्मचारी व अधिका-यांनी स्वच्छता अभियान व वृक्षारोपण मोहिमेमध्ये सुद्धा सक्रियपणे भाग घेतला.
पुढील महिन्यांत, ‘स्वातंत्र्याचा का अमृत महोत्सव’ अंतर्गत रायगड जिल्ह्यातील वंचित मुलांना मदत, त्यांच्यासाठी आरोग्य तपासणी/नेत्र तपासणी शिबिरे, परिसरातील स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्याचा आमचा मानस आहे. याशिवाय बंदर परिसरातील लोकांसाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर व तज्ञ व्यक्तींची प्रेरणादायी व्याख्याने, करिअर मार्गदर्शन, आहार जागरूकता, स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्याची सुद्धा आमची योजना आहे.
Leave a Reply