ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कायद्याचे राज्य प्रस्थापित होण्यासाठी अनुशासित समाजाची नितांत गरज  प्रा. बापूराव बनसोडे

November 27, 202113:26 PM 54 0 0

उरण (संगिता पवार ) : उरण तालुक्यातील फुंडे येथील रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विभाग व एन एस एस यांच्या संयुक्त विद्यमाने आज ” भारतीय संविधान दिनानिमित्त ” भव्य मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदरच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. बापूराव बनसोडे तर अध्यक्ष म्हणून उप प्राचार्य डॉ. विलास महाले उपस्थित होते. समारंभाचे प्रास्ताविक व उद्देश राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. संदीप घोडके यांनी करून दिला. तर आभार प्रदर्शन प्रा. चिंतामण धिंगळे यांनी केले.

राष्ट्रीय कायदा दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना प्रा. बापूराव बनसोडे म्हणाले की, समाजात रामराज्य , ग्रामराज्य या पेक्षाही महत्वाचे कायद्याचे राज्य आवश्यक आहे आणि असे नियमांना श्रेष्ठ मानणारा समाज अनुशासित व नियम युक्त वर्तन असेल तरच निर्माण होऊ शकतो. याकरिता आपण सर्वांनी भारतीय राज्यघटने वरती नितांत प्रेम करणे व विश्वासाने राज्यघटनेच्या तत्त्वांचे पालन करण्याचे पवित्र कार्य केले पाहिजे. तरच समाज अनुशासित बनू शकतो असा कायद्याच्या चौकटीत वावरणारा समाज जंगलराज किंवा झुंडशाहीला नाकारतो म्हणजेच अशा ठिकाणी तालिबान सारखी व्यवस्था निर्माण होऊ शकत नाही. याकरिता सर्वांनीच एकत्रित पणाने भारतीय संविधानातील लोकशाही , न्याय, धर्मनिरपेक्षता स्वातंत्र्य व समता या प्रधान मूल्यांची सतत जोपासना केली पाहिजे व त्याच्या उल्लंघनाच्या विरुद्ध चळवळ उभी केली पाहिजे. सदरच्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये प्रा. डॉ. संदीप घोडके यांनी मत मांडले की, २६ नोव्हेंबर हा दिवस आपणा सर्वांच्या दृष्टीने पवित्र दिवस आहे. कारण याच दिवशी स्वतंत्र भारताला स्वतःची राज्यघटना प्राप्त झाली. म्हणजेच हा राज्यघटनेचा वाढदिवस, याला अपवित्र करण्याचे काम काही दहशतवादी संघटना करीत असतात. परंतु आपण सर्वांनी त्यावर मात करून आजच्या दिवसाचे महत्त्व आणि पावित्र्य अबाधित ठेवू यात. याकरिता सामूहिक रित्या संविधानाचे पारायण गरजेचे आहे. सामूहिकरीत्या राज्यघटनेचा सरनामाचे वाचण आवश्यक आहे. याचबरोबर राज्यघटनेतील संकल्पनांच्या चिंतन, मनन व अंमलबजावणी करणे काळाची गरज बनली आहे. फार अल्पावधीत भारताने वेगवेगळ्या आघाडीवर प्रगती केली. याचा पाया भारतीय राज्यघटनेत आपणास सापडतो. राज्य घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२७ पासून जवळपास जगातील अनेक राज्यघटनांचा अभ्यास करून एक अत्यंत आदर्श राज्यघटना भारतीयांसाठी दिली आणि ती भारतीयांनी स्वीकारली. म्हणूनच भारतामध्ये तालिबान सारखी प्रवृत्ती डोके वर काढू शकत नाही.
समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे उपप्राचार्य मा.डॉ. विलास महाले म्हणाले की, राष्ट्रीय कायदा दिन आपण सर्वांनी उत्साहात व प्रचंड श्रद्धेने साजरा केला पाहिजे. तरच कायद्याच्या विरुद्ध असणाऱ्या प्रवृत्त नष्ट होऊ शकतील. किंवा कायद्याच्या विरुद्ध वागण्याचे त्यांना नीतिधैर्य प्राप्त होणार नाही. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील निवडक विद्यार्थी, प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सर्व प्रा. एम.सी. सोनवले,राम गोसावी, दिलीप केंगार ,अमोद ठक्कर , सोलोमन , श्रीकांत गोतपगार, सुजाता पाटील, भगत मॅडम आवर्जून उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागातील डॉ. विद्या नावडकर यांनी सुरेख पद्धतीने केले. याच कार्यक्रमात भारत सरकार मधील यु.जी.सी. व महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशाप्रमाणे भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉक्टर संदीप घोडके यांनी केले, त्यास उपस्थित सर्वांनी उत्तम प्रतिसाद दिला. सदरचा कार्यक्रम अत्यंत सुनियोजित, आखीव-रेखीव व उत्साहात चांगल्या पद्धतीने साजरा केल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते माननीय रामशेठ ठाकूर साहेब, विभागीय चेअरमन आमदार बाळाराम पाटील साहेब इतर सर्व स्थानिक व्यवस्थापन समितीतील सदस्य आणि महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. साहेबराव ओहोळ यांनी विद्यार्थी,कार्यक्रमाचे संयोजक प्रा. डॉ. संदीप घोडके यांचे व सर्व सहकाऱ्यांचे कौतुक केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *